चोपडा महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत महावाकेथाँनचे आयोजन

चोपडा दि. ३० : चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात रस्ते सुरक्षा व जबाबदारीने वाहन चालन या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महावाकेथाँन-२०१९ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कँसी ग्लोबल, सीएसआर डायरी यासारख्या सामाजिक संघटनांनी पुरस्क्रुत केलेल्या रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत महावाकेथाँन चे आयोजन करण्याची संधी कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाला उपलब्ध करून दिली. महावाकेथाँन च्या शुभारंभ प्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश जी. पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री. अविनाश गोंगाडे, चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनायक लोकरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संदीप आराक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए. एल. चौधरी, डॉ. के. एन. सोनवणे, डॉ. व्ही. टी. पाटील, प्रा. एन. एस. कोल्हे, प्रा. बी. एस. हळपे, प्रा. व्ही. वाय. पाटील, श्री. डी. एम. पाटील उपस्थित होते.

डॉ. शैलेश वाघ यांनी महावाकेथाँन-२०१९ चे प्रास्ताविक केले. रस्ते अपघातात होणाऱ्या म्रुत्युंच्या बाबतीत भारत जगातील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र असून २०१६ च्या आकडेवारी नुसार भारतात ४,७३,००० रस्ते अपघात होवून १,५१,५३७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत आहेत. त्याकरिता रस्ते सुरक्षितता संदर्भात व्यापक जनजागृती निर्माण होण्यासाठी या महावाकेथाँन चे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महावाकेथाँन रँलीचा शुभारंभ करण्यात आला.
रँली महाविद्यालय परिसरातून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत गाडगे महाराज चौक, थाळनेर दरवाजा, गोल मंदिर, मेनरोड मार्गाने पुन्हा महाविद्यालयात येवून तेथे समारोप करण्यात आला.

समारोप प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनायक लोकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रामाणिक पणे रस्ते सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे तसेच समाजातील घटकांना देखील रस्ते सुरक्षितता व जबाबदारीने वाहन चालविण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. हेल्मेट वापर करणे, मोबाईल चा वापर वाहन चालवतांना करु नये अशा सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या. प्राचार्य डॉ. सूर्यवंशी यांनी देखील विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षितता काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले.
महावाकेथाँन रँलीच्या यशस्वी आयोजनासाठी महावाकेथाँनचे समन्वयक डॉ. आर. आर. पाटील, सहसमन्वयक प्रा. मुकेश पाटील, प्रा. विशाल पाटील, प्रा. अभिजीत साळुंखे, प्रा. विवेकानंद शिंदे, प्रा. दिपक करंकाळ, प्रा. निव्रुत्ती पाटील यांचे सह सर्व प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी प्रयत्न केले. महावाकेथाँन रँलीत महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या हजारो विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.





