किडझी प्रि स्कुलच्या वार्षिक अभ्यासक्रमातर्गत प्रकल्प उपक्रम व आनंद मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा (प्रतिनिधी) – येथील धनवाडी रोड लगत असलेल्या किडझी प्रि स्कुल मध्ये वार्षिक अभ्यासक्रम उपक्रम व आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला
आज दि २९ रोजी येथील किडझी प्रि स्कुल मध्ये वार्षिक अभ्यासक्रम उपक्रमात प्राणी संग्रहालय ,दुग्धजन्य पदार्थ ,पोस्ट ऑफिस , कापड दुकान, किराणा दुकान ,भाजीपाला मार्केट, फ्रूट शॉप , पारिवारिक स्नेहबंधन, वाहतुकीचे नियम रेल्वे स्टेशन ,विमान व एअरपोर्ट इत्यादी अभ्यासक्रमातील प्रकल्प उपक्रम आयोजित करण्यात आले काही विद्यार्थ्यांनी व्यतिरेखा वेषभुशेसहित रेखाटली त्यास उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले बुरहानुद्दीन अलिसागर राजा या विद्यार्थ्याचा पोस्टमॅन विषयी, पलाश महाजन याचा डेअरी प्रॉडक्ट विषयी . मन्यू कानडे याचा फ्रुट स्टॉल विषयी ,काव्या पाटील हीचा किराणा शॉप विषयी ,तोषिका मोरे हिचा किडझी प्रिस्कूल चोपडा विषयी ,राशी पाटील हीचा ट्रान्सपोर्ट ची साधने विषयी ,गौतमी कोळी हीचा बर्डस विषयी, आत्मन गुजराथी याचा विंटर विषयी ,शुभ भामरे याचा व्हेजिटेबल शॉप विषयी ,विधी व विवांश शर्मा यांचे विविध सिजन्स विषयी, स्वरा भादले कापड दुकान विषयी,अनुष्का साळुंके हिचा विविध प्रकारची घरे विषयी ,शोर्य सूर्यवंशी याचा स्टेचू ऑफ युनिटी विषयी ,कबीर जैस्वाल याचा गार्डन विषयी ,मिहिका मकरंद सोनवणे हिचा विविध शेप्स विषयी ,अंश शर्मा याचा झू विषयी ,लवीन पटले याचा अनिमल्स विषयी ,सलमान जहागीरदार याचा वाइल्ड अनिमल्स विषयी ,दक्ष व दिव्यम याचा फार्म अनिमल्स विषयी ,हिमांशी आहिरे चा ट्रान्सपोर्ट विषयी ,चिराग बोरसे याचा विंटर सिजन विषयी ,चैतन्य पाटील याचा वॉटर सेव्हीग हाऊस विषयी, नीरज महेश मोकाशे याचा फ्रुटस विषयी ,ताईबा फारूक शेख हिचा ट्रान्सपोर्ट विषयी ,फरीदा ट्रान्सपोर्टवाला हिचा माय इंडिया सिजन्स विषयी , चैतन्य कोळंबे याचा रेनी सिजन विषयी ,जिज्ञेश शिंदे याचा बॉडी पार्टस विषयी ,गौरवकुमार कुमावत याचा अनिमल्स विषयी ,युगांत अहिरे याचा मायसेल्फ विषयी ,जिहान वळवी याचा मायसेल्फ विषयी,माही श्रीकांत पाटील हीचा ट्रॅफिक सिग्नल विषयी प्रोजेक्ट होता.यावेळी
मुलांच्या सुरक्षितते विषयीची शपथ घेण्यात आली
सदरील आनंद मेळाव्यात विद्यार्थीच्या पालकांनी व इतर जनतेने सहभाग नोंदवला व आनंद मेळाव्याचे आनंद घेतला विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वतः आनंद मेळाव्यातील पदार्थ खरेदी विक्री केली त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानात भर पडली तसेच विद्यार्थ्यांची शिक्षण ज्ञानरचनावाद पद्धतीने आनंददायी व कृतीयुक्त व्हावे तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून व्हावे यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होऊन अध्ययन व अध्यापन प्रक्रिया रंजक व सुलभ झाली या अनुभवातून विद्यार्थ्यांची श्रमप्रतिष्ठा मूल्य वृद्धिंगत झाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शक प्रा. विजय पाटील संचालिका सौ सुनिता व्हि पाटील सौ सुगना जैन, कु शितल जांगीड, कु. पल्लवी पाटील सौ. मनीषा पाटील फातेमा ट्रान्सफरवाला सौ. पंचशीला वाघ, सौ वैशाली मांडे ,सौ. मालती सोनार ,सौ दिपाली संसे, जुलाल पाटील यांनी परिश्रम घेतले
तर विशेष सहकार्य सोपान पाटील, किरण पाटील, यांनी केले
