चोपडा महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दि.२८/११/२०१९ गुरुवार रोजी ‘महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री.एन. एस. कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, “महात्मा फुले यांनी त्या काळातील गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारून अस्पृश्यांच्या शैक्षणिक समाजिक उन्नतीसाठी कार्य केले. पहिली मुलीची शाळा पुणे येथील भिडे वाडा येथे उघडून स्त्री शिक्षणाची सुरवात केली. बाल हत्या प्रतिबंध, सत्यशोधक समाजाची स्थापना, अनाथ आश्रमांची निर्मिती केली असे त्यांनी सांगितले.”
उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितेच्या आधारे महात्मा फुले यांच्या विचारांची मांडणी केली. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, समाजसुधारणा यासंबंधीचे विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.डी.डी.कर्दपवार यांनी केले. तर आभार श्री.बी.बी.पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.व्ही.बी.पाटील, श्री.एम.एल.भुसारे, श्री.पी.जे.बेहेरे, श्री.एस.एस.चौधरी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी बहुसंख्य व विद्यार्थी उपस्थित होते.