चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टला शासनाचा आदर्श जलसंवर्धक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान
देशाला महासत्ता व्हायचे असेल तर शेतकरी व खेड्याशिवाय पर्याय नाही —
—– भास्कर पेरे पाटील

चोपडा ( प्रतिनिधी ) — सामान्य माणसाने काय करावे? आणि काय करू नये ? यांचा सल्ला शासानाच्या अधिकाऱ्यानी आम्हाला शिकवू नये जनतेने काय करु नये यापेक्षा पर्याय सुचवला तर जनता नक्कीच अनुकरण करेल असे सांगत त्यांनी सांगितले की देशाला महासत्तेकडे घेऊन जायचे असेल तर शेतकरी शिवाय आणि खेड्याशिवाय भारत महासत्ता होऊच शकत नाही असे भास्कर पेरे पाटील यांनी दाव्याने सांगितले
नाशिक येथे ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन , मीडिया एग्झिबिटर्स आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन कृषी प्रदर्शनात आदर्श जलसंवर्धन पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदे येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी बोलताना सांगितले
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार हेमंत गोडसे , माजी आमदार नितीन भोसले , आयोजक संजय न्याहारकर आदी मंडळी स्टेजवर उपस्थित होते
याबाबत उदाहरण देत त्यांनी सांगितले की, इथे थुंकू नये, झाडे तोडू नये असे अनेक पाट्या दिसतात परंतु झाडं तोडू नये तर चुलीत काय टाकावे ? इथं थुंकू नये तर मग कुठे थुंकण्याची व्यवस्था केली आहे का ? असा थेट सवाल करत मुळात सरकारचे धोरणच नाही सरकारच एकच धोरण आहे आणि ते म्हणजे शेतकरी कसा मरेन परंतु शेतकरी मेला तर या देशाची अर्थव्यवस्था मरेल हे निश्चित आहे मी माझ्या गावत सुविधा देत आहे ती सुविधा कोणत्याही पक्षाचे सरकार देणार नाही मला शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही परंतु कष्ठाला विज्ञानाची जोड आवश्यक आहे आधुनिकता शिवाय शेतकऱ्यांला कुठेही किंमत राहणार नाहीं आणि सरकारचेच पाय धरावे लागतील आणि ते करायचे नसेल तर आधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे असे सांगत त्यांनी अनेक उदाहरणे देत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टला आदर्श जलसंवर्धक पुरस्कार २०१९ नुकतेच जाहीर करण्यात आला होता .या पुरस्काराचे वितरण २४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे मोठ्या दिमाखात पार पडले
चोपडा तालुक्यात मागील २ वर्षां पासून कमी झालेले पर्जन्यमान , पाणी टंचाई यामुळे भूजल पातळी आपला निच्चांक गाठत होती. यासाठी “जल है तो कल है ” हि संकल्पना मना मनात रुजवण्यासाठी कार्य सुरु केले. संस्थेच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसानंतर सर्व नाले , शेततळे , बंधारे यात कोट्यवधी लिटर्स जलसंचय झाला. परिणामस्वरूप प्रकल्पा अंतर्गत
पाण्याचा दुर्भिक्ष कमी होऊन संबंधित गावातील चाहुबाजूंना जलाशयात पाण्याचा साठा झाला. यामुळे गावातील कूपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्ट ने केलेले असे आखीव रेखीव काम बघून हा पुरस्कार देण्यात आला आहे
या पुरस्कारासाठी आम्हाला भारतीय जैन संघटना, गावकरी , तसेच सार्वजनिक सेवा ट्रस्टी, संचालक, सभासदाचे ,कर्मचारी या सर्व्याचे सहकार्य मिळाले आहे हा पुरस्कारामुळे शासन दरबारी चोपडाचे नाव उल्लेखनीय कामात नोद झाली आहे असे ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले
यावेळी मोरेश्वर प्रभाकर देसाई (उपाध्यक्ष),प्रफुल्ल किसनदास गुजराथी (ट्रस्टी), विकास कांतीलाल गुजराथी(ट्रस्टी), शिरीष दगडुसा गुजराथी (ट्रस्टी),व्ही.डी. पारीख (संचालक),मंगेश वसंत परांजपे (मॅनेजर), भारतीय जैन संघटनेचे विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन , तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडिया, हरीष गुजराथी (कर्मचारी)
चंद्रकांत सुंगधी, अरविंद सुंगधी, शैलेश सुंगधी,राजेंद्र सुंगधी (सभासद) आदी हजर होते