महाराष्ट्र 9

चोपडा शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

[espro-slider id=13780]

चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद


 चोपडा:-(प्रतिनिधी)—— येथील चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी शनिवारी सकाळी अचानक येथील बालमोहन उच्च माध्यमिक व लिटल हार्ट इंग्लिश मेडिअम शाळेला भेट दिली व विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अचानक आलेले पोलीस पाहून विद्यालय परीसरातील विद्यार्थी थोडे घाबरले मात्र त्यांना बोलतं केल्याने विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली.   यावेळी बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या प्रीती सरवय्या यांनी त्यांचे स्वागत केले. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी बोलतांना सांगितले की फक्त सदिच्छा भेट आहे.विद्यार्थ्यांना पोलीस आणि त्यांचे काम याची माहिती तुम्हाला व्हावी यासाठी मी भेटायला आलो आहे.यावेळी त्यांनी ट्रॅफिक चे नियम, स्कूल बस मधील प्रवास ,विक्षिप्त लोकांची वागणुकीची जाणीव याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी  बोलताना सांगितले की,पुढील आयुष्यातील शिक्षणाचे नियोजन लोकसेवा, राज्यसेवा च्या परीक्षेची तयारी कशी करावी,आपल्याकडे असलेल्या स्मार्टफोन चा वापर कसा अभ्यासात करता येईल,अभ्यासात सोप्या पद्धती कशा प्रकारे वापरायच्या याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शनिवारी पोलिसांशी चर्चा करता आली त्यांनी पोलिसतील माणूस अनुभवला त्यामुळे विद्यार्थी आनंदी होते.यावेळी अमर संस्थेचे सचिव दीपक जोशी,बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक विजय दीक्षित प्राचार्या प्रीती सरवैय्या,तुषार पाटील,विलेश सोनवणे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]