चोपडा तालुका स्तरीय विज्ञान मंचची स्थापना अध्यक्षपदी पी.सी. पाटील यांची निवड
चोपडा प्रतिनिधी
येथील पंकज विद्यालयात दि.२० रोजी तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची सहविचार सभा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सहविचार सभेत विविध वैज्ञानिक स्पर्धा व उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याकरिता चोपडा तालुका विज्ञान मंच समितीची स्थापना करण्यात आली.या विज्ञान मंच समितीच्या अध्यक्षपदी पंकज विद्यालयातील श्री पी.सी. पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

विज्ञान मंच समिती व कार्यकारणी ची नावे पुढील प्रमाणे.
श्री. पी. सी. पाटील – अध्यक्ष,श्री. एस. एच. पाटील- उपाध्यक्ष,श्री. अतुल चव्हाण- सचिव,श्री. संजय सोनवणे- प्रसिद्धी प्रमुख,श्री. एस.व्ही. करमरकर- कोषाध्यक्ष,श्री. अनंत पाटील-सदस्य,श्री.दिलीप सावकारे,श्री. आर. आर. बडगुजर,श्री. एस. एम. चव्हाण,श्री.एस. जी. पाटील,श्री. एस. एल. पाटील,श्री. ललित पाटील,श्री. अजय पाटील,श्री.एस. डी. पाटील,श्री. ए. डी. संदानशिव,श्री. पी. डी. महाजन,श्री. इब्राहिम तडवी,श्रीमती लिना चव्हाण,श्रीमती पी.आर. अडकमोल
श्रीमती मंजू महाजन,श्रीमती मनीषा सुर्यवंशी.
यांची निवड करण्यात आली.भावना भोसले यांनी आगामी काळात चोपडा तालुक्यात होणाऱ्या तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ची संपूर्ण जबाबदारी या विज्ञान मंचकडे सोपवली आहे.यापुढे कायमस्वरूपी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शना चे नियोजन मंच करणार असल्याचे ठरले. समिती गठीत करण्यासंदर्भात संजय सोनवणे यांनी परिश्रम घेतले. (सोबत श्री पी सी पाटील यांचा फोटो जोडला आहे.)





