महाराष्ट्र 9

चोपडा महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी विद्यार्थी मेळावा आयोजन

[espro-slider id=13780]

चोपडा महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी विद्यार्थी मेळावा आयोजन


कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात दि.२१/११/२०१९,वार गुरुवार रोजी दुपारी४:००वा.स्मार्ट क्लास रुम ,प्रतापगड ईमारत येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
१९६९साली महाविद्यालयाची स्थापना झाली असुन स्थापनेपासून आजपर्यंत महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचे आपण साक्षीदार आहात. कारण आपण या महाविद्यालयात शिक्षण घेऊन जे
शैक्षणिक यश संपादन केले व त्यामुळे आपण विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात दैदीप्यमान अशी यशस्वी वाटचाल करीत आहात.
स्वतः चा आणि महाविद्यालयाच्या यशाचा व प्रगतीचा दिपक सतत तेवत ठेवला आहे.सोबतच आपण समाजाची व राष्टाची देखील तत्परतेने प्रामाणिक सेवा करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपल्या आयुष्याच्या महत्वपूर्ण जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे महाविद्यालय आता सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करीत असतांना आपण या दीर्घ प्रवासाचे साक्षीदार म्हणून या महाविद्यालयाचा वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या मेळाव्यास उपस्थित राहुन आपल्या मनातील महाविद्यालया विषयी भावना, विचार जाणून घेण्याची आम्हास तीव्र ईच्छा अआहे, महाविद्यालयाची प्रगती त्या द्रुष्टीने होण्यासाठी आपले काही नियोजन असल्यास ते जाणून घेण्यास आम्हाला आनंदच होईल,आणि त्याच अनुषंगाने महाविद्यालय वाटचाल करेल असा आम्हाला विश्वास आहे.आपल्या व महाविद्यालयाचा यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थींना मेळाव्यासाठी आमंत्रित करतांना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
याप्रसंगी मेळाव्यासाठी महाविद्यालयाचे व प्राणीशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी शास्त्रज्ञ डॉ. वसंत रुपसिंग जाधव (उपाध्यक्ष, अलँनम फार्मासिटीकल,अमेरिका ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म.गा.शि.मं.चे अध्यक्ष आदरणीय भैय्यासाहेब अँड.संदिप सुरेश पाटील
उपस्थित राहणार आहेत.तरी या माजी विद्यार्थी मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.ए.सुर्यवंशी व माजी विद्यार्थी मेळावा प्रमुख डॉ. पी.एस.लोहार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]