तंबाखु मुक्त अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान जिद्दी ने राबवणारे कॅन्सर ग्रस्त राज मोहम्मद खान शिकलगर रविवारी आकाशवाणी वर विशेष मुलाखत,,,,

चोपडा( प्रतिनिधी ):- तंबाखु, गुटखा मुळे तोंडाचा कॅन्सर झाला कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करून ज्याचा मुळे कॅन्सर झाला त्याचा विरुद्ध जिद्दी तंबाखु मुक्त अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान राबवणारे चोपडा शहराचे आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांची मुलाखत जळगाव आकाशवाणी वर तंबाखु चे दुष्परिणाम व जीवनात कॅन्सर वर मात या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली त्याचे प्रसारण रविवारी संध्याकाळी ६:०० वाजता आकाशवाणी जळगाव केन्द्र वरून करण्यात येणार आहे





