महाराष्ट्र 9

चहार्डी येथील ग्रामसेवक सुकदेव पारधी अखेर निलंबित… मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई…

[espro-slider id=13780]

चहार्डी येथील ग्रामसेवक सुकदेव पारधी अखेर निलंबित… मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी सुकदेव पारधी आपला मनमानी कारभार करीत असल्याने त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती व त्यांची तात्काळ बदली व हकालपट्टी करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे निवेदन दिले होते .सदर निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे म.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी चोपडा पंचायत समितीत स्वतः उपस्थित राहून ग्राम विकास अधिकारी सुकदेव पारधी यांच्या कामाची सखोल चौकशी करत अखेर सुकदेव पारधी यास निलंबित केले.
तसेच नागलवाडी ग्रामपंचायतीतील अपहार, विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या विरोधात म. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत तरी सदर अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.


ग्राम विकास अधिकारी सुकदेव पारधी यांच्या कार्यकाळात
चहार्डी ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज पूर्ण वेळ होत नव्हते. तसेच त्यांनी १५ व्या वित्त आयोगातील एकही रुपया खर्च केला नव्हता. सतत गैरहजर राहणे. मनमानी कारभार करणे, नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नव्हत्या. ग्रामस्थांना उतारे, दाखले वेळेवर मिळत नव्हते. गावात स्वच्छता व साफसफाई होत नव्हती. गटारी व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता होत नव्हती. कामगारांचे पगार थकीत झाले आहेत. त्यामुळे कामगार कामावर येत नाहित. कामगार कामावर येत नसल्याने पाणी पुरवठा वेळेवर होत नसून ग्रामस्थांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच सार्वजनिक शौचालयांचा मैला उघड्यावर आला असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत. चहार्डी ग्रामपंचायतसाठी पूर्णवेळ ग्रामसेवकाची नेमणूक व्हावी व कार्यालयाच्या ठिकाणी कायम स्वरुपी निवासी ग्रामसेवक असावा जेणेकरुन नागरीकांचे कामे वेळेवर होतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते.


सदर संदर्भात सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांना वेळोवेळी विनंती करण्यात आली होती तरी देखील ग्रामसेवक सातत्याने मनमानी कारभार व गैरहजर राहून बेजबाबदारपणे वागत होते. व माझी तक्रार ग्रामस्थांनी कुठेही केली तरी माझे कोणताही अधिकारी काहीच करू शकत नाही असे सांगत होते. तरी अशा बेजबाबदार ग्रामसेवकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी चहार्डी ग्रामस्थांनी केली होती…
सदर ग्रामसेवकावर कारवाई झाल्याने ग्रामसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]