महाराष्ट्र 9

पॉलिश करण्याच्या बहाण्याने भरदिवसा ४० हजाराची सोन्याची पोत लांबविली !# जामनेरच्या दोघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल ! पोलिसांचा कारवाईवर प्रश्नचिन्ह ?

[espro-slider id=13780]

पॉलिश करण्याच्या बहाण्याने भरदिवसा ४० हजाराची सोन्याची पोत लांबविली !# जामनेरच्या दोघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल ! पोलिसांचा कारवाईवर प्रश्नचिन्ह ?


महाराष्ट्र9न्यूज प्रतिनिधी चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा तालुक्यातील मोहरद येथे मंगल पोत पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अडावद पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, तालुक्यातील मोहरद येथे ज्योत्स्ना जगदीश पाटील ह्या वास्तव्यास आहेत. दि. ११ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता डिगंबर तुकाराम शेवरे (वय ३८) आणि ईश्वर नारायण शिंदे (वय ४०, दोघं रा. ओझर ता. जामनेर) या दोघांनी ज्योत्सना पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांची ४० हजाराची सोन्याची मंगल पोत पॉलीश करून देतो असे सांगितले.


यानंतर मंगल पोत आपल्या ताब्यात घेऊन घरातून डबा आणायला सांगितला. त्यानंतर डब्यात काहीतरी पावडर व हळद टाकून २० मिनीटे उघडु नको असे भासवून फसवणुक केली. या प्रकरणी अडावद पोलिसात डिगंबर शेवरे आणि ईश्वर शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. जयदिप राजपूत हे करीत आहेत.


या प्रकरणी गावकऱ्यांनी चार साधूंना पोलिसांचा ताब्यात दिले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असताना फक्त दोनच साधूंवर गुन्हा दाखल का करण्यात आला ? अशी चर्चा परिसरात रंगली आहे .उर्वरित दोन साधूंना सोडण्या मागचे कारण काय ? या विषयी सहा. पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही .त्यामुळे पोलिसांचा कार्यवाही संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. चारही साधू हे एकाच गावाचे असून तसेच एकाच ठिकाणाहून चारही साधुंना एकाच ठिकाणाहून गावकऱ्यांनी पोलिसाचा स्वाधीन केले होते. चार पैकी दोन साधुंवर गुन्हा दाखल करून दोन साधूंना का सोडण्यात आले अशी चर्चा परीसरात रंगताना दिसत आहे ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]