महावीर सोशल ग्रुपची चोपड्यात स्थापना;अध्यक्षपदी नितिन बरडीया तर सचिवपदी शांतीलाल कोचर यांची सर्वानुमते निवड..
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी) :-
चोपडा येथील सर्व नवयुवकानी समाज हितासाठी एकत्रित येऊन एक संघटण तयार करावे. असे विचार ठेवले गेले तदनंतर आज रोजी
दिनांक 11 जानेवारी 2023 येथील अचलगच्छ आराधना भवन मध्ये रात्री नऊ वाजता जैन समाजाचे उपाध्यक्ष सुनील बरडीया यांच्या नेृत्त्वाखाली बैठक घेण्यात आली यात महावीर सोशल ग्रुप स्थापन करावा अशी संकल्पना सर्वानुमते ठेवण्यात आली .


या ग्रुपचे प्रथम अध्यक्षपदी नितीन रमेशचंदजी बरडिया यांची तर उपाध्यक्षपदी क्षितिज तेजपालजी चोरडिया, सचिवपदी शांतीलाल सुकलालजी कोचर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून गौतम नेमीचंदजी जैन, सल्लागार म्हणून दिनेश लोडाया, सुशील अलिझाड, लतीश जैन,दर्शन देशलहरा, गौतम टाटीया ,कमलेश चोपडा,कुशल बुरड,आदि की निवड एक वर्षासाठी करण्यात आली ह्या ग्रुप तर्फे समाजहित उपयोगी उत्सव, मेडिकल केंप, धार्मिक कार्यक्रम घेण्यात येईल असे अनेक उपक्रम घेण्यात येतील. ड्रेस कोडसाठी पाच सदस्याची एक समिती गठीत करण्यात आली.तसेच दर पौर्णिमेला व अमावस्येला नवकार महामंत्र जापचे आयोजन करण्यात आले आहे बैठकीची सांगता महामंगलीक ने करण्यात आली. या बैठकीत मोठ्या संख्येने नवयुवक हजर होते.







