चोपड्यात अनाधिकृत अवैध गावठी पिस्टल बाळगणारा अटकेत…#स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा शहरात कारगील चौक भागात पिवळा टि शर्ट घातलेला इसम हा त्याचे कमरेला गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे विभागाचे पथक हे चोपडा येथे रवाना होवून चोपडा शहरातील भाऊ हॉटेल समोर मिळालेल्या बातमी प्रमाणे संशयीत इसम दिसल्याने त्यास थांबण्याचा इशारा करता, तो पळू लागला असता, त्यास पथकाने जागीच पकडून त्याची अंगझडती घेता त्याचे पॅन्टच्या कमरेला १ गावठी बनावटीचा पिस्तुल व मॅगझीन मध्ये १ जिवंत काडतुस मिळाल्याने त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजित गुजर बारेला, वय ३७, रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा मुळ रा. पानसेमल ता. पानसेमल जि. बडवाणी मध्यप्रदेश असे सांगीतले.


आरोपी अजित गुजर बारेला, वय ३७, रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा मुळ रा. पानसेमल ता. पानसेमल जि.बडवाणी मध्यप्रदेश यास वरील पथकाने ताब्यात घेवून त्यांचे कडून ३००००/-रु. किं.चे १ गावठी पिस्टल, १,०००/- रु. कि.चे १ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाणे वाढले आहे तरी त्याबाबत शोध घेवून योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील संदिप पाटील, गोरख बागुल, ,प्रविण मांडोळे, परेश महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आदींनी कारवाई केली….







