भारतीय जैन संघटनेतर्फे फुटपाथच्या व असाह्य विद्यार्थ्यांना स्वेटर,टोपी सोबतच खाऊ वाटप
31 डिसेंबर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा..
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी ) —
चोपडा येथील भारतीय जैन संघटनातर्फे एक आव्हान सोशल मीडियावर करण्यात आले होते की आपण 31 डिसेंबर न साजरी करता रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीब व असाह्य विद्यार्थ्यांना स्वेटर,टोपी व मिष्टान्नसह खाऊ वाटप करण्यासाठी मदतीच्या हात पुढे करावा या आव्हानाला प्रतिसाद देता शेकडो लोकांनी यथाशक्ती दानदात्यांनी मदत केली भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून अनेक शेकडो विद्यार्थ्यांना स्वेटर टोपी व मिष्टान्नसह खाऊ वाटप करण्यात आले .

यावल रोड परिसर ओम शांती कार्यालय जवळील झोपडपट्टीत तसेच विठ्ठल मंदिराच्या शेजारी असणाऱ्या झोपडपट्टीत धनवाडी तसेच अनेक तांड्यांवर अशा विविध ठिकाणी असणारे असाह्य विद्यार्थीना दोन वर्षापासून तर जवळपास अठरा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. 31 डिसेंबरला कोणतीही पार्टी न करता लोकवर्गणीतून भारतीय जैन संघटनेच्या सदस्यांनी स्वेटर टोपी मिष्टान्नसह खाऊ वाटप करून वर्षाच्या शेवटच्या दिवस असाह्य विद्यार्थ्यांना छोटीशी भेट देऊन साजरे करण्यात आले यावेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव कोचर, कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेंचा, शुभम राखेचा, दिनेश लोढाया, लतीश जैन, (पत्रकार), आदेश बरडीया, आनंद आचलिया, श्रेणिक रूणवाल, आकाश जैन, रोहन राखेचा आदींनी मेहनत घेतली

