कोरेगाव भीमा २०५ वा शौर्य दिन:विजय स्तंभास चोपड्यात अभिवादन ..
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
२०५ वा शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी पहाटेपासूनच मोठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरेगाव याठिकाणी १ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये ऐतिहासिक लढाई झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी या लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधला. १ जानेवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला तेव्हापासून शौर्य दिनाची प्रथा सुरु झाली.

चोपडा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विजय स्तंभ उभारण्यात आला आहे. सदर विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी जिल्हा संघक हितेंद्र मोरे, तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे,शहराध्यक्ष भरत शिरसाठ, समता सैनिक दल प्रमुख मेजर शालीग्राम करंदीकर,अशोक बाविस्कर , रमेश शिदे,संतोष अहिरे, प्रा.हांडे, प्रा.नरेंद्र कोल्हे , प्रा.दिलीप सपकाळे, सुदाम ईशी,रविंद्र वाडे , सुदाम करनकाळ, भगवान छोटू वारडे,सुकदेव बाविस्कर , संजय अहिरे,सचिन बाविस्कर, भूरसिंग बाविस्कर ,अनिल वाडे, देवानंद वाघ , रमेश सोनवणे, जानकीराम सपकाळे, संजय साळुंखे , दिपक मेढे,संघपाल सावते, सुनिल शिरसाठ आदी समाज बांधव व तालुक्यातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
