महाराष्ट्र 9

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाला नॅकचे ‘ए’ मानांकन

[espro-slider id=13780]

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाला नॅकचे ‘ए’ मानांकन

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी) :-


चोपडा – येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाला नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद) या राष्ट्रीय संस्थेतर्फे ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे.


       दि. २२ व २३ डिसेंबर रोजी प्रा. केसरी लाल वर्मा (छत्तीसगड), प्रा.  अंकुर सक्सेना (गुजराथ), डॉ विक्टोरिया मेरी (तामिळनाडू) या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयाची, येथील शैक्षणिक व भौतिक सुविधांची तसेच महाविद्यालयाच्या उपक्रमांची पाहणी करत येथील प्राध्यापक, माजी विद्यार्थी, पालक, महाविद्यालयाशी संबंधित विविध घटकांशी चर्चा केली होती. या समितीने पाठवलेल्या निरीक्षणाच्या आधारे महाविद्यालयाला ए मानांकन दिले असल्याचे नॅकचे डॉ. एस. सी. शर्मा यांनी कळवले आहे. सदर मानांकन हे पुढील पाच वर्षासाठी वैध असणार आहे.


     गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या विकासास हातभार लावणाऱ्या संस्थेच्या या प्रयत्नांना समितीने गौरवले आहे. समाजकार्य महाविद्यालयाने दुसऱ्या चरणामध्ये हे मूल्यांकन प्राप्त केले आहे.
    याबद्दल माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, सचिव अश्विनी गुजराथी, प्राचार्य डॉ. ईश्वर संवर्धनकर उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, समन्वयक डॉ. अनंत देशमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]