महाराष्ट्र 9

कस्तुरबा विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यालयात येऊन गहिवरले,विद्यालयाने शिक्षणासोबतच दिले संस्काराचे धडे..!

[espro-slider id=13780]

कस्तुरबा विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यालयात येऊन गहिवरले,विद्यालयाने शिक्षणासोबतच दिले संस्काराचे धडे..!


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी) :–

चोपडा कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील १९९०-९१यावर्षीची बॅच पुन्हा एकदा ३१ वर्षांनी “गेट-टुगेदर” च्या माध्यमातून एकत्रित आले. इतरत्र कोणत्याही ठिकाणी न भेटता आपल्या विद्यालयातच येऊन जुन्या आठवणींना या विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांनी उजाळा दिला. गेल्या ३१ वर्षा नंतर दि.२५ रोजी येथील कस्तुरबा विद्यालयात एकमेकांशी हितगुज साधले.


महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक ए एन महाजन होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक एम एन शिंदे,ए पी पाटील,जी जे शिंदे,एस एम पाटील,मुख्याध्यापक एच बी मोरे,पर्यवेक्षक एस एल पाटील,व्ही पी पाटील,पी डी शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एच बी मोरे यांनी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.


सर्वांना एकत्रित आणण्यासाठी राहुल पाटील, अॅड सतिश पालीवाल, मुकेश देशमुख, शांताराम गाडीलोहार,मनोज पाटील यांनी व्हॉट्स ॲप आणि फेस बुक च्य माध्यमातून एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले.
मेळाव्यात विद्यालयाने शिक्षणासोबतच संस्काराचे धडे दिले असल्याने नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी ते अतिशय उपयुक्त ठरत असल्याची ग्वाही माजी विद्यार्थ्यांनी दिली. तसेच विद्यालयातील शिक्षकांनी त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे एक आदर्श व्यक्ती म्हणून कार्यरत आहोत असे सांगितले.या कालावधीत मिळणाऱ्या प्रत्येक अनुभवाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होत आहे. आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचप्रमाणे जुन्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला.
वडिलांनी सांगितले की,(स्व.)अक्कासाहेब यांच्या शाळेत शिकायचं आहे म्हणून उत्तमरीत्या या शाळेत शिक्षणाचे बाळकडू मिळाले. १० वी “अ” च्या वर्गात जाऊन त्यावेळी ज्या बेंच वर बसत होते त्या बेंचवर बसून विद्यार्थी दशेतला आनंद घेतला.माजी मुख्याध्यापक एस पी सोनवणे यांच्याशी व्हिडीओ कॉल वरून संपर्क केला.संदीप पाटील उद्योजक या माजी विद्यार्थी यांनी ११ हजार रुपयांची देणगीचा धनादेश विद्यालयास भेट दिला.यावेळी नाशिक,औरंगाबाद,सुरत, जळगाव ,शिरपूर, धुळे, या जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून माजी विद्यार्थी उपस्थित होते.मेळाव्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी
अॅड सतिश पालीवाल यांनी केले.


आलेल्या प्रत्येकाने आपल्या मनातील भावना मनोगतातून व्यक्त केल्या. जुन्या आठवणी सांगताना अनेकांचा यावेळी कंठ दाटून आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेच्या संस्थापिका स्व शरदचंद्रिका पाटील,माजी आमदार स्व डॉ सुरेश जी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सेवानिवृत्त मयत शिक्षक व माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.दुपारनंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेत शेवटी चलते चलते ही याद रखना, कभी अलबीदा ना कहना..!या गाण्याने शेवट केला.


## चौकट :– मी नोकरीत रुजू झालो तेव्हा या बॅचचे विद्यार्थी १० वी त होते आणि आता हे माझे सेवेतील शेवटचे वर्ष आहे म्हणजे सेवानिवृत्त होतांना आपण “गेट-टुगेदर” होत आहे हा एक अविस्मरणीय योग असल्याचे मुख्याध्यापक एच बी मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]