महाराष्ट्र 9

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

[espro-slider id=13780]

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


सन 2022 चा रेजोनन्स हा कार्यक्रम ‘वृंदावन थीम’ माध्यमातून अप्रतिम सादर झाला सदर थीम मध्ये तब्बल ६२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा तालूक्याचे भूषण असलेले व ज्यांची नुकतीच कलेक्टर म्हणून निवड झाली आहे असे गौरव साळुंखे तसेच प्राचार्य निलेश चोपडे, KVTR स्कूल शिरपूर प्राचार्य विकास चौधरी अँड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर, देवमन माळी संगवी इंटरनॅशनल आदी उपस्थित होते.


संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे,संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, गोकुळ भोळे , प्राचार्य डाॅ. आर. आर. अत्तरदे, व्ही आर पाटील , एम. व्ही. पाटील, गणेश साळुंखे, सौ. रेखा पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने व त्यांच्या कलाकृतीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रयोगासाठी क्रेन, घोडा गाडी यांचा उपयोग करण्यात आला. अखंडित असा कार्यक्रम घेऊन पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ने प्रेक्षकांना सांस्कृतीक मेजवानी दिली.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील व सांस्कृतिक विभाग प्रमुख अमित पाटील, विनोद शिंपी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . वर्षभरातून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रमात वरद काबरा, अथर्व सुभेदार यांचा AIMS सारख्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला त्याबद्दल त्यांचा कौतुक समारंभ या कार्यक्रमात करण्यात आला. वृंदावन महानाट्यामध्ये पालकांच्या हस्ते महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सनेर, युक्ती अग्रवाल, दुर्वांशी कडू या विद्यार्थ्यांनीं केले .आभार प्रदर्शन आदित्य प्रसन्न पाटील व स्वरा मुकेश पाटील यांनी केले….

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]