एस.एस.जी.बी आयटीआय, वेले तर्फे
वृक्षारोपण संपन्न…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा येथील श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था चोपडा संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वेले तर्फे संस्थेचे अध्यक्ष निसर्गप्रेमी डॉ. संदिप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.चोपडा-धरणगाव रस्त्यालगत प्रामुख्याने निंब, सिसु, चिंच आदी देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.


संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदिप पाटील यांना झाडांविषयी कमालीची आस्था व आवड असुन वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दिसून येते.म्हणूनच संस्थेचे अध्यक्षांच्या वाढदिवसाला औ.प्र.केंद्र वेले येथील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्याचे योजिले. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी विपुल पाटील, प्राचार्य दिव्यांक सावंत, सचिन पाटील, भुषण देशमुख, आशुतोष पाटील, राहुल सैंदाणे व सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

