महाराष्ट्र 9

गौऱ्यापाडाव येथे घरातून ५५००० रू किमतीचे सागवान जप्त वनविभागाची कारवाई…

[espro-slider id=13780]

*गौऱ्यापाडाव येथे घरातून ५५००० रू किमतीचे सागवान जप्त* वनविभागाची कारवाई…


महाराष्ट्र9प्रतिनिधी चोपडा प्रतिनिधी:-


वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा व रेंज स्टाफ चोपडा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सातपुडातील गौऱ्यापाडाव येथे रमेश भांगा पावरा यांच्या घराची सर्च वॉरंट बजावून झडती घेतली असता घराच्या मागील बाजूस एक रंधा मशीन व साग कटसाईज नग ९७ अवैधरित्या आढळून आले.सदर मुद्देमालाचे मोजमाप ०.६७८ घ.मी.व मुद्देमाल व रंधा मशीनसह किंमत ५५०००/- इतकी असून सदर मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनाने मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे जमा करण्यात आला आहे.


सदर कार्यवाहीत बी के थोरात वनक्षेत्रपाल चोपडा, शिवा बारेला वनपाल सत्रासेन ,प्रशांत सोनवणे वनपाल उमर्टी ,वनरक्षक एस. के. कंखरे ,सुनील भोई ,सीमा भालेराव, संदीप पावरा ,सोनाली बारेला, उज्वला बारेला, विजया बारेला, सरला भोई ,वाहन चालक गोविंदा चौधरी व मदन मराठे वनसेवक योगेश, ऋषिकेश,विशाल यांनी सहभाग घेतला .


सदर कार्यवाही विवेक होशिंग वनसंरक्षक धुळे ,संजय पाटील विभागीय वन अधिकारी ( दक्षता) धुळे,प्रथमेश हडपे सहा. वनसंरक्षक चोपडा, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली….

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]