कस्तुरबा च्या विद्यार्थ्यांनी गाजविले मैदान
जिल्हास्तरीय स्पर्धेत यश,विभागीय स्तरावर निवड ..
महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी) :–
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी
क्रीडा स्पर्धेत येथील कस्तुरबा माध्यमिक
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन करून संघाची विभाग स्तरावर निवड झाली आहे.

विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची कबड्डी संघाची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धासाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संघात
विकास बाला बारेला, पियुष अनिल पाटील, रोहित नाना बारेला, रोहन संजय गायकवाड, धम्मदीप विनोद वाडे, ज्ञानेश्वर मधुकर पाटील, भावेश महेश माळी, बळीराम सुरेश भिलाला,तेजस सुभाष पाटील, दर्शन भरत पाटील, किरण गुलाब मराठे, हर्षल विनोद पाटील,यांचा समावेश आहे.

यासह तालुकास्तरीय शालेय स्पर्धा मध्ये काही स्पर्धक विजयी झाले असून त्यांची जिल्हास्तरीय खेळा साठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विकास बाला बारेला (२०० मीटर धावणे),विकास बारेला (लांब उडी) संस्कृती प्रशांत पाटील (थाळीफेक) सिद्धार्थ भीमराव साळुंखे (भालाफेक) गायत्री ज्ञानेश्वर मराठे (थाळीफेक) तनवी देविदास महाजन (थाळीफेक)योगेश पंढरीनाथ पवार (कराटे) यांची जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.त्यांना व्ही पी पाटील यांनी मार्गदर्शन केले.या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ऍड संदीप पाटील, सचिव डॉ स्मिताताई पाटील यांनी केला.
मुख्याध्यापक एच बी मोरे,पर्यवेक्षक एस एल पाटील यांनी अभिनंदन केले.







