महाराष्ट्र 9

जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील लाचखोर सहा.अधिकारी जाळ्यात!#
जिल्हा उपनिबंधक लिपिकाने केली २० हजाराची मागणी… १० हजार घेताच एसीबीने घेतले ताब्यात !

[espro-slider id=13780]

जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील लाचखोर सहा.अधिकारी जाळ्यात!#
जिल्हा उपनिबंधक लिपिकाने केली २० हजाराची मागणी… १० हजार घेताच एसीबीने घेतले ताब्यात !

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-



जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दि ९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका कर्मचाऱ्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज शुक्रवारी दुपारी रंगेहात अटक केली. शशीकांत नारायण साळवे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.


जिल्ह्यातील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज शुक्रावारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सापळा रचला. दरम्यान, लिपीक शशिकांत नारायण साळवे यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.



या अनुषंगाने संबंधीत तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात शशिकांत नारायण साळवे या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे ,पो.कॉ.राकेश दुसाने यांनी केली आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]