महाराष्ट्र 9

हातेड खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदाची माळ सौ. शालिनी रमेश सोनवणे यांच्या गळ्यात.. ९ पैकी ६ ग्रा.प. सदस्य बिनविरोध तर ३ जागांसाठी ७ रिंगणात उमेदवार…

[espro-slider id=13780]

हातेड खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदाची माळ सौ. शालिनी रमेश सोनवणे यांच्या गळ्यात.. ९ पैकी ६ ग्रा.प. सदस्य बिनविरोध तर ३ जागांसाठी ७ रिंगणात उमेदवार…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा( प्रतिनिधी ):-


चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाची निवड अविरोध झाली असून सरपंच पदाची माळ सौ. शालिनीताई रमेश सोनवणे यांच्या गळ्यात पडली आहे. तर ६ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर ३ जांगासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत अविरोध करण्यासाठी गावातील धुरंधरांनी सायंकाळ पर्यंत कंबर कसली मात्र काही सदस्यांनी हेका न सोडल्याने फुलहारांसह माघारी परतावे लागल्याची नामुष्की ओढवली व गावाचे बिनविरोध निवडीच्या बक्षिसावर पाणी फेरल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.


लोकनियुक्त सरपंच पदासाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा रिटायर्ड ग्रामसेवक रमेश हिंमतराव सोनवणे यांच्या धर्म पत्नी सौ शालिनीताई रमेश सोनवणे ह्यांना सर्व प्रथम नागरिकाचा मान देऊन सरपंच पदाची माळ गळ्यात टाकली. या शर्यतीतील सौ. प्रतिभा सुनील बाविस्कर, सौ. भारती राजेंद्र बाविस्कर, सुगंधाताई ज्ञानेश्वर शिरसाठ, सौ. कल्याणी दिनेश सोनवणे, सौ.ललिता चंद्रकांत सोनवणे, सुनंदा रविंद्र सोनवणे यांनी माघार घेत सौ.शालिनीताई सोनवणे ह्यांना सरपंचपदी विराजमान होण्यास मार्ग मोकळा करून दिला.


६ ग्रा.प.सदस्य बिनविरोध विजयी
निवडणुकीत ९ पैकी ६ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.वार्ड क्रं. १ : सौ. सुलोचना राजेंद्र सोनवणे, वार्ड क्रं.२:सौ.उज्वला सुनील पाटील, रघुनाथ हिरामण बाविस्कर,झिंगुबाई कैलास भील, वार्ड क्रं. ३ : अनिता समाधान शिरसाठ, पंडित पौलाद शिरसाठ असे ६ सदस्य अविरोध झाले आहेत.


३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात
त्यात वार्ड क्रं. १ मध्ये निरंजन मनोहर सोनवणे, रविंद्र दिनकर सोनवणे, निंबा दत्तात्रय बाविस्कर यांच्यात लढत आहे तर कु. मयुरी रमाकांत देवराज व सुनिता विकास बाविस्कर यांच्यात सरळ सरळ लढत आहे. शिवाय वार्ड क्रं. ३ मध्ये सुनील मुरलीधर शिरसाठ व रविंद्र पांडुरंग सपकाळे यांच्यात दुरंगी लढत आहे. एकंदरीत ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]