माजी शिक्षणमंत्री स्व. शरदचंद्रिकाआक्का पाटील यांना हजारोंनी वाहिली श्रद्धांजली, 80 जणांनी केले रक्तदान
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा(प्रतिनिधी):-
महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री व तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्व. शरदचंद्रिकाआक्का सुरेश पाटील यांचा 40 वा स्मृती दिवस असल्याने महात्मा गांधी शिक्षण मंडळ आवारातील त्यांच्या स्मृतिस्थळावर दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान हजारो लोकांनी श्रद्धांजली वाहिली. सर्वप्रथम महात्मा गांधी शिक्षण मंडळ चे अध्यक्ष ॲड संदीपभैय्या सुरेश पाटील, सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील,विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे,माजी सभापती सुरेश सीताराम पाटील, कारखान्याचे माजी चेअरमन अँड घनश्याम पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रा. नीलम पाटील यांचे सह हजारो प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजी शिक्षण मंत्री शरद चंद्रिका पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली अर्पण करण्यावेळी जवळपास सर्व क्षेत्रातील त्यात राजकीय क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित अश्या विविध स्तरातील लोकांनी श्रद्धांजली वाहिली.


तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या पॉलिटेक्निक विभागात 80 विद्यार्थ्यांनी शरदचंद्रिका सुरेश पाटील यांचा स्मृतिदिवस असल्याने रक्तदानही केले. त्यामुळे गरजूंना रक्ताची व्यवस्था ही त्या निमित्ताने झाली, ही विशेष बाब आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी गटनेते जीवन चौधरी गोपाळ पाटील, डॉ.विकास हरताळकर, ॲड. रवींद्र जैन, डॉ जयंत पाटील, डॉ दिपक पाटील, पंकज बोरोले, प्राचार्य मिलिंद पाटील माजी मुख्याध्यापक टी. एम. चौधरी,अमळनेर जी प सदस्या जयश्री पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील,डॉ डी ए सूर्यवंशी, बाजीराव पाटील, वामनराव पाटील, गिरीश पाटील, आशिषभाई गुजराथी, प्रवीण गुजराथी, मंगेश भोईटे, प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी, गोविंदा महाजन, अकबर पिंजारी, तरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक, श्री. एस बी पाटील, अमृतराव वाघ, प्रमोद पाटील डॉ बी आर पाटील, रमाकांत सोनवणे, एम व्ही पाटील, रवींद्र पाटील, दगा कोळी, गोपाळ धनगर, अशोक पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, श्री के. डी. चौधरी, रमेश भोईटे, अजबराब पाटील, देवीदास सोनवणे, रमेश सोनवणे, माजी सभापती कांतीलाल पाटील,उल्हास पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ महेंद्र जैस्वाल, डॉ.लीना जैस्वाल, डॉ लोकेंद्र महाजन, डॉ प्रेमचंद महाजन, डॉ पराग पाटील डॉ रवींद्र पाटील, चोसाका संचालक जितेंद्र पाटील माजी नगराध्यक्षा मनीषा चव्हाण, श्री. आर डी पाटील, अनिल वानखेडे,संजीव शेटे, देवेंद्र पाटील, मनीष गुजराती, जगन्नाथ पाटील, शरद मोरे, ऍड एस डी पाटील, अशोक पाटील साहेबराव कंखरे, अरुण कंखरे, डॉ निर्मल टाटीया, योगेश सनेर, संजीव बाविस्कर, विकास शिर्के, डॉ विनीत हरताळकर, डॉ अमित हरताळकर, डॉ सागर पाटील,विजय सपकाळे स्टीफन सपकाळे, बी एम पाटील, संतोष अहिरे, नंदकिशोर पाटील, कैलास माळी,नगरसेवक रमेश शिंदे, हुसेनखा पठाण राजू शर्मा, आर बी कोतवाल, जगन्नाथ बाविस्कर, प्रकाश राजळे, किशोर पाटील,अशोक साळुंखे, दिलीप साळुंखे, माया साळुंखे, प्रा संदीप पाटील, शैलेश वाघ, एच बी मोरे,निळकंठ सोनवणे, राजेंद्र बिटवा, किशोर चौधरी, शशी देवरे, प्रदीप पाटील, प्रा शाम भाई गुजराथी, राजेश सराफ, राजेंद्र साळुंखे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवानंद शिंदे, दिलीप नेवे, तुळशीराम पाटील डॉ गुरुप्रसाद वाघ, श्रीकांत नेवे, रंजना नेवे,सतीश बोरसे,अनिल कदम,राजेंद्र पाटील यांचेसह हजारो प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
