महाराष्ट्र 9

जिल्हा दूध संघाचा निवडणुक प्रचार शिगेला..#चोपड्यात प्रचार मेळाव्याचे आयोजन…# निवडणुकीत तब्बल ८ आमदार निवडणूक रिंगणात उभे आहेत निवडणूक प्रेस्टिजची;पालकमंत्री गुलाबराव पाटील..

[espro-slider id=13780]

जिल्हा दूध संघाचा निवडणुक प्रचार शिगेला..#चोपड्यात प्रचार मेळाव्याचे आयोजन…# निवडणुकीत तब्बल ८ आमदार निवडणूक रिंगणात उभे आहेत निवडणूक प्रेस्टिजची;पालकमंत्री गुलाबराव पाटील..



महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


जिल्हा दुध संघाची निवडणूक यंदा प्रचंड गाजत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आव्हान दिले आहे. ते मुक्ताईनगरमधून दूध संघाच्या विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत ही लढत निवडणुकीतील बिग फाईट समजली जात आहे.
जिल्हा दूध संघांची निवडणूक प्रचाराला वेग आला असून चोपडा तालुक्यातील ४२ मतदारांसाठी शहरांतील आनंदराज पॅलेस या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला होता.


सदर मेळाव्यासाठी ना. गुलाबराव पाटील ( पाणीपुरवठा तथा पालकमंत्री जळगाव ) आ. चिमणराव पाटील (पारोळा ) , आ.किशोर पाटील ( पाचोरा ), आ.मंगेश चव्हाण ( चाळीसगाव ), आ. संजय सावकारे ( भुसावळ ) स्मिता वाघ , संजय पवार यांसह स्थानिक नेते शांताराम पाटील, आत्माराम म्हाळके, चंद्रशेखर पाटील , जी टी पाटील, पंकज पाटील यांसह उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची चोपडा तालुक्याची जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर सोपवली असल्याची माहिती आ. मंगेश चव्हाण यांनी दिली तसेच चोपडा तालुक्यात एकूण ४२ मतदार आहेत पैकी आज मेळाव्याला ३७ मतदारांनी उपस्थिती लावल्याने त्यांनी बदलाची नांदी असल्याचे आपल्या मनोगतात म्हटले..


पाचोर्‍याचे आ. किशोर पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वाघ यांनी व्हिडिओ द्वारे शेतकरी विकास पॅनलला आपले जाहीर समर्थन दिले आणि शेतकरी विकास पॅनल साठी सहकारात राजकारण करणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेत असल्याचे आ किशोर पाटील म्हणाले..


ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत मी कधी पडलो नाही. प्रथम सर्वांच्या आग्रहाखातर उमेदवारी घ्यावी लागली. सदर निवडणुकीत तब्बल ८ आमदार निवडणूक रिंगणात उभे आहेत प्रेस्टिजची निवडणूक आहे. नाथा भाऊ दूध विकास मंत्री असताना संघाला शून्य फायदा झाला आणि आता काय फायदा होणार असा खोचक टोला त्यांनी लगावला. दूध संघाची सध्याची उलाढाल ४०० कोटींची असून ती १००० कोटी पर्यंत कशी जाईल यासाठी मी प्रयत्न करणार महाराष्ट्रात कॉल्ड स्टरेज नव्हते का ? तूप साताऱ्याचा वाईमधे ठेवल आणि भाड पन्नास लाख रुपये भरल असे ते म्हणाले. नाथाभाऊंचा अभ्यास एवढा आहे की ,सांगता येणार नाही असा खोचक टोला त्यांनी लगावला ….

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]