महाराष्ट्र 9

चांदसणी येथे आज यात्रोत्सव…
श्री काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी…

[espro-slider id=13780]

चांदसणी येथे आज यात्रोत्सव…
श्री काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा तालुक्यातील श्री काळभैरवनाथांचा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी असून हा यात्रोत्सव आठवडाभर सुरु असतो. यंदा सुमारे ६ लाख भाविक श्री काळभैरव नाथांचे दर्शन घेतील अशी माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे .


मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे यात्रोत्सव बंद होता पण यावर्षी यात्रोत्सव होत असल्याने दर्शनासाठी तोबा गर्दी पहावयास मिळत आहे.
अडावदच्या पूर्वेस चार किलोमीटरवर चांदसनी गाव आहे. तेथील ( कै ) पुंजू रावजी पाटील यांचे गुरु दुलाबाबा यांच्या प्रेरणेने १९५५ मध्ये काळभैरव नांथांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. पूर्वी काळभैरव नाथांची मूर्ती उघडयावर होती .यासाठी तत्कालीन तहसिलदार शुक्ल यांनी मंदिरासाठी दहा हजार चौरस फुट जागा उपलब्ध करून दिली . परिसरातील ग्रामस्थानी पुढकार घेऊन वर्गणी करून मंदिर बांधले. कानळदा येथील कण्व आश्रमाचे चंद्रकिरण महाराज यांच्या हस्ते मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. यात्रोत्सवाची संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे

. यात्रेत खाद्य पदार्थ ,सौदर्य प्रसाधनाची दुकाने, भांड्याची दुकाने थाटण्यात आली आहेत . मुलांचा मनोरंजनासाठी विविध प्रकारचे पाळणे, झुले , खेळणी दाखल झाली आहेत. रात्री लोक नाटय तमाशाही होणार आहे .
# चांदीचे डोळे मुकुट अर्पणाची प्रथा #
काळभैरवनाथांना नैवेद्य अर्पण करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. काळभैरव नाथांच्या मूर्तीस भाविक चांदीचे डोळे ,चांदीचा मुकुट अर्पण करतात. सर्व व्यवहार सांभाळण्यासाठी काळभैरव नाथबाबा नावाची नोंदणीकृत संस्थाही कार्यरत आहे .यात्रेत येणाऱ्या भाविकाच्या निवासासाठी भक्तीनिवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवसाला लागणाऱ्या सर्व वस्तू संस्थेने विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत .


# माहेरवाशिणीसाठी पर्वणी #
हा यात्रोत्सव म्हणजे माहेरवाशिणीसाठी आनंदाची पर्वणीच असते. चांदसणी ,कमळगांव ,पिंप्री , रुखनखेडा या गावातील सासरी गेलेल्या मुली दिवाळीत येत नाहीत मात्र यात्रोत्सवाच्या काळात हजेरी लावून दिवाळी मनवितात .नौकरी व्यवसाया निमित्त बाहेरगावी गेलेले अनेक लोक यात्रोत्सवासाठी गावी परततात .काळभैरव नाथांना श्रध्देने ११:२१ अशा संख्येने श्रीफळ वाढवून नवस फेडले जातात . त्याचप्रमाणे लोडगे हा नवसाला सुग्रास भोजनातील हमखास असणारा पदार्थ स्वादिष्ट व नवसाच्या कार्यक्रमास आलेल्या नातेवाईकांना भुरळ घालणारा पदार्थ आहे .


# जादा बसेसची व्यवस्था #
काळभैरवनाथ यात्रोत्सवासाठी चोपडा आगारा तफै जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.अडावद , यावल ,चोपडा ,जळगांव ,अमळनेर ,भुसावळ, रावेर येथूनही जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.अशी माहिती आगारप्रमुख संदेश क्षीरसागर, स्थानक प्रमुख परेश बोरसे ,सहायक वाहतूक निरीक्षक अशोक पवार ,सरताज पठाण, संजय सोनवणे, अनिल बाविस्कर यांनी दिली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, उपनिरीक्षक चंदकांत पाटील यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.


# सर्पदंश झालेल्याची होते गर्दी #
काळभैरवनाथांना भाविक जागृत देवस्थान माननात. सर्पदंश झालेल्या व्यवती मंदिरात येतात. मंदिरात प्रवेश केल्यापासून अन्न पाणी व झोप न घेता थांबतो. काळभैरवनाथांचे नामस्मरण करतो. त्यानंतर सळाच्या भाताने उपवास सोडतो. त्यांनतर तो बरा होतो अशी आख्यायिका आहे. पूर्वापार ही प्रथा सुरु आहे .
# यात्रोत्सवाची जय्यत तयारी #
लोकांना बसण्यासाठी भव्य सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर रंगरंगोटी करून परिसरही सुशोभीत करण्यात आला आहे .
देणगीदारांची नावेही फलकावर लावण्यात आली आहेत . मंदिराचा कळसावर मोठा दिवा लावण्यात आला आहे. मंदिराचा बाजुला दोन हेक्टर दहा आर क्षेत्र शेत घेतले आहे .त्याजागी भक्तासाठी भक्तीनिवास ,बागबगीचे , शैचालय , भोजन सभागृह अशा विविध सुविधांचे काम होणार आहे. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह ,रस्ते , प्रसादालय आदी विविध कामे करणार आहेत . तसेच मंदिराचा कळसावर जाण्याकरिता स्टीलची सिडी ६५ फुट तयार केली आहे .


तसेच यापुढे विविध कामे करणार आहेत अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रविण सावळे ,उपाध्यक्ष हरिष पाटील, सजीव गणेश पाटील सहसचिव, ज्ञानेश्वर ठाकरे , शालीक पाटील सरपंच, मिराबाई भालेराव पोलीस पाटील ,भिकन भालेराव, प्रा. पंढरीनाथ बाविस्कर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]