महाराष्ट्र 9

भाजपवाल्यांनी चोपडा सूतगिरणी मध्ये एक सभासद बनवला असेल तर मला दाखवा अरुणभाई गुजराथी यांचा लासुर मध्ये सवाल..

[espro-slider id=13780]

भाजपवाल्यांनी चोपडा सूतगिरणी मध्ये एक सभासद बनवला असेल तर मला दाखवा अरुणभाई गुजराथी यांचा लासुर मध्ये सवाल ..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-


कैलास पाटील हे महादेवाचे भक्त असून त्यांना महादेवाचा मोठा आशीर्वाद आहे ते महादेवाचे भक्त असून त्यांनी मला विधानसभेत पाडून टाकले तर बाकीच्यांचे काय राहिले.भाजप पैनल चे ‘सूतगिरणी बचाव’ हा शब्द मला आवडला नाही सहकारात राजकारण नको निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न केले मात्र ती होऊ शकले नाही चोपडा तालुक्यात सूतगिरणी मध्ये सभासद करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्याने एक सभासद बनवला असेल तर मला दाखवा असे जाहीर आव्हान विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी लासुर येथील सहकार पॅनलच्या मेळाव्यात बोलताना सांगितले .


आज नाटेश्वर महादेव मंदिर लासुर या ठिकाणी सहकार पॅनल चा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्याला अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार व उमेदवार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील,शिंदे गटाचे ए के गंभीर,चोपडा पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, कारखान्याचे माजी चेअरमन एड घनश्याम पाटील, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे ,बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा प्रदीप पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,जिल्हा परिषद सदस्य प्रा नीलम पाटील, यासह अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.


यावेळी सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रत्येक निवडणुकीत तालुक्यात मतदारांसमोर जात असताना त्यांनी सहकाराच्या प्रकल्पाबाबत लोक नेहमी विचारतात. मी बंद पडलेली सूतगिरणी चालू केली तालुक्यातील सर्व नेत्यांनी या सुतगिरणी चालू व्हावी म्हणून मला शेअर्स करून दिले. दोन वर्षाच्या आत शेतकऱ्यांच्या कापूस कसा खरेदी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे .चोपडा सूतगिरणी मध्ये विजेचा फार मोठा खर्च असून ती विजेचा खर्च वाचवण्यासाठी पूर्ण सूतगिरणी मी सोलर प्रकल्प उभारणार असून कोणाचाही भाग भांडवल न घेता सूतगिरणी उभी करून दाखवणार असून लवकरच त्या सूतगिरणी मध्ये जिनिंग प्रेसिंगही सुरू करणार असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले.


मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले की जळगाव जिल्ह्यात खडका, नगरदेवळा,या सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. फैजपूर चा कारखाना विक्री झाला आहे, जिल्ह्यात अनेक संस्था बंद असून हे मनाला दुःखदायक घटना !आहेत.
आपण चोसाका भाड्याने दिला आणि आज तो मोठ्या दिमाखात सुरू आहे, त्याचप्रमाणे माजी आमदार कैलास पाटील यांनी बंद पडलेली सुतगिरणीच चालू करून दाखवली ज्यांच्या सहकारावर प्रेम आहे त्यांच्या हातात सूतगिरणीचे भवितव्य द्यावे नजीकच्या कारखान्यांपेक्षा चोपडा साखर कारखाना हा पन्नास रुपये जास्त भाव देईल असे माझे बोलणे झाले आहे. कोरोना काळात जीडीपी हा शेतकऱ्यांमुळे टिकून राहिलेला आहे. भाजपचेही काही लोक मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत सूतगिरणी मध्ये होते त्यांनी काय काम केले आणि आता सूतगिरणी बचाव पॅनल म्हणून गावागावात फिरत असताना त्यांचं काय योगदान होते असाही सवाल विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी उपस्थित केला असून सहकार पॅनलचा सर्वच्या सर्व जागा विजयी होतील अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मेळाव्याचे सूत्रसंचालन कारखान्याचे माजी संचालक रमेश पाटील यांनी केले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]