कोळंबा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी…
महाराष्ट्र9न्यूज चोपडा प्रतिनिधी :-
अख्ख्या विश्वाला मानवतेचा संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी, खंजिरीचे निर्माते व ग्रामगीतेचे रचनाकार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी निमित्त्याने यांच्या पावन स्मूर्तीस विनम्र अभिवादन करण्यास समस्त कोळंबा येथील समाज बांधव एकत्र येऊन पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला दीप प्रज्वलित करून व हार अर्पण करून पुण्यस्थिती साजरी करण्यात आली. सोबतच समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलेल्या जाती-धर्म रूढी परंपरा, भेदभाव, अंधश्रद्धा, व समाज संघटन याविषयी मार्गदर्शन केले.

५४ व्या पुण्यतिथी निमित्त कोळंबा गावात दि. १४, १५, व १६, नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या पर्वामध्ये, राष्ट्रसंतानी सांगितलेल्या दोन अतिशय महत्वाच्या साधना केल्या , त्या म्हणजे ‘सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थना, दररोज नित्य-नियमानुसार पूर्ण गावात सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत सामुदायिक ध्यान केले तर संध्याकाळी ५:३० ते ६:३० या दरम्यान सामुदायिक प्रार्थना केली . तसेच परीसरातील अनेक राष्ट्रसंत प्रेमी मंडळी जमलेली होती, गावात दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने, तसेच ग्रामगीतेद्वारे जनजागृती केली जाते.

गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परिक्षा । भावचि भगता अवदशा । येईल देशा,
अशा अनेक प्रकारचे वचने सांगुन ग्राम लिलया करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या, महान संतांची महिमा गायली जाते. शब्दसंत हे मानवतेचे महान पुजारी आहेत. सर्व-धर्म समभाव हा त्यांचा संदेश होता .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कोळंबा येथे तीन वेळेस येऊन गेले आहेत. प्रत्येक घरात ग्रामगीता व राष्ट्रसंताची प्रतिमा उपलब्ध असून नित्य नियमाने पठण व ध्यान केले जाते.
तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली…






