*एरंडोल विभाग कुस्ती स्पर्धेत पंकज महाविद्यालयातील तीन खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेत निवड*
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव अंतर्गत एरंडोल विभाग आंतर महाविद्यालय कुस्ती स्पर्धा दि.१५ नोव्हेंबर रोजी डी डी एस पी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय एरंडोल येथे संपन्न झाल्या.
या कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयांतील खेळाडूंनी खालील वजन गटात यश संपादन केले त्यांची एरंडोल विभागीय संघात निवड करण्यात आली.


65 किलो वजन गट
प्रथम क्रमांक — महेश वाघ* (एस.वाय.बीए.)
70 किलो वजन गट
प्रथम क्रमांक — गोविंद सोनवणे* (एफ.वाय.बीए.)
55 किलो वजन गट
द्वितीय क्रमांक–पाटील पूजा
(टी.वाय.बीए.)
यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले,संचालक पंकज बोरोले,संचालक मंडळ,प्राचार्य प्रो.आर.आर.अत्तरदे,सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.विजय का.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

