महाराष्ट्र 9

चोपड्यात पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांची धाड …४३ हजारांचा मुद्देमालासह ६ आरोपी जेरबंद…

[espro-slider id=13780]

चोपड्यात पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांची धाड …४३ हजारांचा मुद्देमालासह ६ आरोपी जेरबंद…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


सहा. पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास शहरांतील आशा टॉकीजच्या पाठीमागील बंद घराच्या आडोशाला , बाभळीच्या झाडाखाली सूरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर अचानक धाड टाकली असता त्यात सलीम अली शब्बीर अली वय ३१ वर्षे रा. भोकरवाडा, योगेश दगडु पाटील वय ३४ वर्षे रा. पंकजनगर, शेख रज्जाक शेख अब्बास वय ५८ वर्षे रा. पटवेगल्ली, अनिल प्यारेलाल लोहार वय ४५ वर्षे रा. मराठे गल्ली,
जैनउद्दीन समशोद्दीन हलवाई वय २८ वर्षे रा. मुस्तफा कॉलनी, गणेश प्रकाश खंदारे वय ३२ वर्षे रा. शेतपुरा अशा ६ आरोपींसह ४३,६००/ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.


शहरात आशा टॉकिजच्या पाठीमागील बंद घराच्या आडोशाला, बाभळीच्या झाडाखाली वरीलप्रमाणे ६ आरोपीसह आपले स्वतःचे फायदयासाठी बेकायदा ५२ पत्याचे कॅटवर मांग पत्ती ( झन्ना मन्ना½ नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना पत्ता जुगाराची साधने व रोख रुपये, मोबाईल हॅन्डसेट असे एकुण ४३,६००/ रुपये किंमतीचा मुद्देमालासह मिळुन आले म्हणुन रावसाहेब एकनाथ पाटील ( पोलिस मुख्यालय, जळगाव ) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात भाग ६ , सी सी टी एन एस गु र न ४५८/२०२२ मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले , शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पारधी करीत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]