महाराष्ट्र 9

खाजगी कर्जाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल… विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न…

[espro-slider id=13780]

खाजगी कर्जाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल… विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न…


महाराष्ट्र9न्यूज चोपडा प्रतिनिधी :-


खाजगी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्मखाजगी कर्जाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल… विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न…


सविस्तर वृत्त असे की , योगेश दिनकर सपकाळे (वय२४) रा. चौगाव तालुका चोपडा हा तरुण शहरातील एका झेरॉक्स दुकानावर कामावर आहे .त्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने व त्याला पैशांची गरज भासल्याने तालुक्यातील सनपुले येथील काही तरुणांकडून योगेशने पाच हजार रुपये घेतले व त्या मोबदल्यात प्रति दिवस शंभर रुपये व्याज दररोज देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे काही दिवस योगेशने प्रति दिवस शंभर रुपये व्याज नियमित चुकवले पण त्यानंतर त्याला प्रति दिवसाचे शंभर रुपये व्याज देणे शक्य होत नव्हते. दोन-तीन दिवसाचे प्रति दिवसाचे व्याज थकल्यामुळे ज्या तरुणांकडून त्याने पैसे घेतले होते ते सर्व सहा तरुण एकत्र येऊन योगेशच्या घरी पोहोचले व तिथे धिंगाणा घालत पैशांचे मागणी करत दाराशी बांधलेली बकरी ओढून नेण्याचा प्रयत्न केला .

एवढेच नाही तर मोटरसायकल घेऊन जाण्याच्या देखील प्रयत्न केला व योगेशला जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची माहिती योगेशची आई लताबाई यांनी दिली आहे. योगेशच्या आई वडिलांनी पैशांची हमी घेतली. येत्या चार ते पाच दिवसात आम्ही व्याजासहित पैसे परत करतो असे देखील आश्वासन दिले पण ते तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या भीतीपोटी योगेशने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्याच्या आईने सांगितले. त्याला उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


सदर तरूणाविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता सहा. पोलीस निरीक्षक अमरसिंग वसावे यांनी तक्रारदार यांना दमदाटी करून तक्रार दाखल करण्यास नकार दिला असल्याचे लताबाईंचे म्हणणे आहे तक्रारदार यांनी शेवटी सहा. पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांची भेट घेऊन सदर बाबत तक्रार केली असल्याचे समजते…..


सदर तरुणांच्या वडीलांनी मध्यस्थी व तडजोड करून , माफी मागून दवाखान्याच्या खर्च भरण्याची हमी घेऊन गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली असल्याचे समजते…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]