खान्देशातील पाच चित्रकारांच्या कलाकृतीना राष्ट्रीय पातळीवर गौरव

चोपडा
खान्देश कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते त्यात पाच कलावंतांनी भर घालीत राष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. ते भागवत सपकाळे, मनोहर बाविस्कर , ज्ञानेश्वर माळी, महेंद्र चौधरी व महेश कदम यांनी जयपुर येथे जवाहर कलाकेंद्र चतुद्दिक गॅलरीमध्ये २ व ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय पातळीवर भव्य कला प्रदर्शनात देशभरातून महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, हरीयाणा, चेन्नई, पंजाब, मध्यप्रदेश, अशा शंभर चित्रकारांच्या सहभाग होता. खांन्देशातील पाच चित्रकारानां या राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यात भागवत सपकाळे ( फुपणी ता जळगाव) यांना उत्कृष्ट निसर्ग चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले. मनोहर बाविस्कर ( पिलखोड ता चाळीसगाव )उत्कृष्ट पेन्सिल रेखाटन म्हणुन सन्मानित करण्यात आले. महेंद्र चौधरी (फुपनगरी ता जळगाव)उत्कृष्ट रचना चित्रकार म्हणुन सन्मानित करण्यात आले. ज्ञानेश्वर माळी ( चोपडा)उत्कृष्ट निसर्ग चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले महेश कदम ( चाळीसगाव) उत्कृष्ट अमूर्त चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले . शेतकरी कुटुंबातून आलेले आपल्या नोकरी निमित्त मुंबई येथे कलाशिक्षक पदावर राहुन आपल्या माय भूमीतील संस्कार आपल्या कलेवर छाप देवुन खांन्देशचे नाव राष्ट्रीय स्तरावर नोंदवले आहे. यांचेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.





