चोपडा – धरणगाव रस्त्यावर ऊसाच्या ट्रॅक्टरचे टायर फुटले… जिवीतहानी नाही…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
चोपडा – धरणगाव रस्त्यावर हॉटेल साई प्रसादम् जवळ उसाने भरलेली डबल ट्रॉली ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घसरल्याने या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


सविस्तर वृत्त असे की , तालुक्यांतील चूंचाळे – मामलदे शिवारातील ऊसाने भरलेले डबलट्रॉली सह चालक गोकुळ बापू भिल्ल अंबासेम ढेकू ता. अमळनेर हा ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ बी जी ४५४१ भरधाव वेगाने चहार्डी साखर कारखानाकडे जात असताना हॉटेल साईप्रसादम् जवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने सदर ट्रॅक्टर त्याने रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात घसरल्याने त्यावेळी सदर ट्रॅक्टरचे मोठे टायर जागीच फुटले असून कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. सदर ट्रॅक्टर हे पाचोरा तालुक्यातील अंजनविहीरे येथील मुकादमाचे असल्याचे ट्रॅक्टर चालकाने सांगितले.
