महाराष्ट्र 9

ट्रक अपघातात कृषी पर्यवेक्षकाचा दुर्दैवी मृत्यू… तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच …

[espro-slider id=13780]

ट्रक अपघातात कृषी पर्यवेक्षकाचा दुर्दैवी मृत्यू… तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच …


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:–


चोपडा – यावल रस्त्यावरील देविनी पेट्रोल पंपा जवळ ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल सह मनोहर पाटील ( कृषी सहाय्यक ) ट्रकच्या खाली आल्याने त्यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


सविस्तर वृत्त असे की , सायं ४ वाजेच्या सुमारास अडावद कडून चोपड्याकडे मनोहर पाटील ( कृषी सहाय्यक ) आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी एल ०१५४ ने येत असताना गूळ नदी वरील पुलाच्या वर देविनी पेट्रोल पंप जवळ मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच १९ सी डब्ल्यू ९२७५ या ट्रकने जोरदार धडक दिल्याने मनोहर पाटील आपल्या मोटरसायकल सह ट्रकच्या खाली आले व ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रकने त्यांना मोटरसायकलसह ७० ते ८० फूट फरपटत नेल्याने त्यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला.


अपघात इतका भयंकर होता की, त्यांची मोटार सायकल व ते स्वतः चक्काचूर झाले आहेत .चोपडा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी रेलच्या मारोती जवळ कंटेनरच्या धडकेत मामा व भाची जागीच ठार झाले होते .ती घटना ताजी असताना सदर घटनेने संपूर्ण तालुक्यात पुन्हा हळहळ व्यक्त होत आहे.चोपडा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे .रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्डे वाचवण्याचा प्रयत्नात चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये चर्चिली जात आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालून तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवून अपघातांची मालिका थांबवावी अशी मागणी होत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासंदर्भात विजय दत्तात्रय पाटील ( माजी जिल्हा परिषद सदस्य ) यांनी वर्डी ते चोपडा पर्यंत पायी आंदोलन करून तहसील कार्यालयावर उपोषणास बसले होते. सदर उपोषणास प्रा. अरुण भाई गुजराथी ( माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) यांनी सुद्धा हजेरी लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते व त्वरित खड्डे बुजवण्यासाठी सूचना देखील केल्या होत्या.


सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून अपघातांची मालिका थांबवावी व निरपराध लोकांचा जीव जाणार नाही याचीही काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]