महाराष्ट्र 9

कुठल्याच नात्यात भाऊ बहिणीच्या नात्याइतकी ओढ नसते, म्हणून भाऊबीज सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे…..” गुलाबराव पाटील

[espro-slider id=13780]

कुठल्याच नात्यात भाऊ बहिणीच्या नात्याइतकी ओढ नसते, म्हणून भाऊबीज सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे…..” गुलाबराव पाटील


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–
भाऊ आणि बहिणीचा पवित्र उत्सव म्हणजे भाऊबीज असून गेल्या ४० वर्षांपासून खंड न पडू देता आवर्जून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणीकडून भाऊबीज निमित्ताने आशिर्वाद घेतले.


पालकमंत्री पाटील यांच्या दोन्ही बहिणी चोपड्यात असून एक बहीण गणेश कॉलनी तर दुसरी बहीण सुंदरगढीत राहते. गुलाबराव पाटील हे रक्षाबंधन व भाऊबीज या दोन्ही सणांना आवर्जून उपस्थित राहतात आणि बहिणींचा आशिर्वाद घेतात. सूंदरगढी येथील निर्जलाबाई देशमुख व गणेश कॉलनी भागात सुशीलाबाई गुर्जर या दोन्ही बहिणींची त्यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख, नगरसेवक महेश पवार, राजाराम पाटील,विजय देशमुख, भरत देशमुख,रोहित देशमुख आदी उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी दशेपासून मी या ठिकाणी येत असतो. बहीण आणि भावाचे हे दृढ नाते जेव्हा आई नसते तेव्हा बहीणींचा सर्वात जास्त आधार मिळतो आणि तो मला देखील मिळाला आहे. आज जे मला यश आणि फलश्रुती मिळाली आहे त्यात जसे जनतेचे आशीर्वाद मिळाले आहेत तशाच प्रकारे मला बहिणींचा आशीर्वाद मिळाला आहे.

# बेसंवेदनशिल माणसाने संविधानाच्या गोष्टी करू नये … गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना खोचक टोला…#

ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला असंवेदनशील म्हटले होते. या संदर्भात गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी आदित्य ठाकरे यांना बेसंवेदनशील माणसाने संवेदशीलतेच्या गोष्टी करू नये असा खोचक टोला लगावला… तसेच अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात दौरे केले , किती आमदार व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या , किती शेतकऱ्यांच्या बांधावर गेले , या बाबींचा त्यांनी विचार करावा असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.


शिंदे सरकार संवेदनशील सरकार असून जळगाव जिल्हातील १५ मंडळे ओला दुष्काळ म्हणून जाहिर करण्यात आले आहेत. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे सूरू आहेत. ओला दुष्काळ जाहीर करायला काही नियम असतात.७६५ कोटी रुपयांचे पॅकेज ओला दुष्काळासाठी जाहिर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]