घर गहाण ठेवण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी… विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ… शहर पोलिसात गुन्हा दाखल…
महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडा शहरातील पंचशील नगर येथील विवाहितेस घर गहाण ठेवण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केली .सदर २ लाख रुपये देण्यास विवाहितेने नकार दिल्याने पती, सासू , सासरे व दिर यांनी सातत्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करत गांजपाट केला म्हणून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असे की , युसुफ शेख आमद मणियार ( पती ) , शेख परविनबी शेख आमद मणीयार ( सासू ) , आमद हसन मणियार ( सासरे ) , शेख जुबेर शेख आमद मणीयार ( दिर ) , शेख नदीम शेख आमद मणियार ( दिर ) यांनी संगनमताने फिर्यादी हिस घर गहाण ठेवण्यासाठी २ लाख रुपये आणावेत या कारणावरून व सदर पैसे आणण्यास फिर्यादी यांनी नकार दिला म्हणून
आरोपी यांनी फिर्यादीस वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादिचा वेळोवेळी शरीरिक व मानसिक छळ करून गांजपाट केली म्हणून चोपडा शहर पोलिसात सीसीटीएनएस भाग ५ गुं र नं ४२८/२०२२ भादवी कलम ४९८ अ , ३२३ ,५०४ , ५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर गुन्ह्याच्या पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना.संतोष पारधी हे करीत आहेत..

