महाराष्ट्र 9

महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या संयुक्त कामगिरीने पाच लाख रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त करण्यात वनविभागाला यश..

[espro-slider id=13780]

महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या संयुक्त कामगिरीने पाच लाख रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त करण्यात वनविभागाला यश..



महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी



चोपडा: दि. १४ ऑक्टोबर रोजी यावल वन विभागाकडून मोठ्या प्रकारची धडक कारवाई करण्यात आली. मध्यप्रदेशातील धवली परीक्षेत्रातील धामण्या यागावी अवैध रित्या लाखो रुपयांचा सागवानी साठा जप्त करण्यात आला .यात दोन लाकूड कटाई मशीन,अनेक प्रकारचे फर्निचर व खाट बनवण्यासाठीचा  भरमसाठ कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.


      सदरची गुप्त माहिती यावल वन विभागाकडून मध्य प्रदेश विभागाला देण्यात आली आणि संयुक्तपणे मोठी कारवाई करण्यात यश आले. यावेळी  सहा.वनरक्षक यावल वन विभाग चोपडा प्रथमेश हडपे यांच्या नेतृत्त्वात वैजापूर संपूर्ण परिमंडळ उपस्थित होते.तसेच अधिकारी चोपडा व रेंज स्टाफ वैजापुरचे आय.एस.तडवी वनपाल,चुनिलाल कोळी,बाजीराव बारेला,संदिप भोई,वनरक्षक तसेच गस्तीपथक यावल येथील योगेश सोनवणे वनरक्षक , सचिन तडवी पोलीस शिपाई,आनंद तेली व निखिल पाटील वाहन चालक व धवली रेंजर हेमंत प्रजापती,वरला रेंजर,  रजनेश त्रिपाठी वनपाल , अर्जुनसिंग सेंधवा रेंजर ,  तरूनेद्र,वरला एएसआई रवींद्र ठाकूर प्यारसिंग चौहान तसेच बलवाडी एसडीओ सुरेश अहिरवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनवण्यात आली .


सदर कारवाईत धामण्या येथील विनोद डोंगरसिंग,राजू दरबार, टोनीराम सुमला,सायसिंग पठाण यांना अंदाजे पाच लाखाचा मुद्देमालासह पकडण्यात आले. सदर  माल  घरात आढळुन आला असून मोठी कसरत करून सेंधवा फॉरेस्ट डेपोत हलविण्यात आला आहे. सदर सागवानी लाकूड हे महाराष्ट्रातून कापून ते चोरट्या मार्गाने मध्य प्रदेश येथे नेऊन त्या लाकडाचे फर्निचर करून सर्रासपणे विक्री केले जात असल्याचा प्राथमिक अंदाज वैजापूर येथील आर एफ ओ सोनवणे यांनी सांगितले .


     चोपडा तालुक्यातील तसेच मध्य प्रदेशातील सेंधवा वन विभागात लाकूड माफिया यांच्यात धडकीचे वातावरण निर्माण झाले आहे…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]