महाराष्ट्र 9

ग्रामिण पोलीसांची धडक कार्यवाहीत चोपड्यात दहा लाखाचा गुटखा जप्त ; अन्न सुरक्षा विभागाकडे माल जमा गुटखा तस्करीचा मास्टर माईंड समोर येणार का?

[espro-slider id=13780]

ग्रामिण पोलीसांची धडक कार्यवाहीत ; चोपड्यात दहा लाखाचा गुटखा जप्त ; अन्न सुरक्षा विभागाकडे माल जमा

*गुटखा तस्करीचा मास्टर माईंड समोर येणार का?*

चोपडा ( प्रतिनिधी ) — येथील ग्रामिण पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहिती नुसार लासुर – सत्रासेन रस्त्यावर दहा लाखाचा गुटखा पकडण्यात आला असून याबाबत पुढील कारवाईसाठी अन्न सुरक्षा विभागाकडे देण्यात आले आहे मात्र हा गुटखा कोणाचा? याचा सह अनेक प्रश्न उपस्थित होत असून शहरात दिवसभर चर्चा होती
  सविस्तर असे की, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा ग्रामिण पोलिसांनी सापळा रचून लासुर – सत्रासेन रस्त्यावर मध्यप्रदेशातून येणाऱ्या टाटा कंपनीची 407  ( MH-19 S – 1761 ) या नंबरच्या गाडीत 8,97000  रुपयांचा विमल पान मसाल्याचे 4800 पॉकीट , तसेच 1,12200  रुपयांचा  व्हि -1- तंबाखू  व सुंगधीत तंबाखूचे 4400 पॉकीट असा एकूण 10,09000 रुपयांचा माल पकडण्यात आला   या गाडीवर कांतीलाल राजेंद्र पाटील (ड्रायव्हर ) रा.अकुलखेडा ता.चोपडा , गजानन शिवाजी पाटील, (क्लिन्नर ), रा. चोपडा हे होते  ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ग्रामिण पोलीस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक संदीप आराक मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजू महाजन, पो.हे.कॉ भरत नाईक, पो.कॉ. विष्णु भिल, पो.कॉ. सुनिल कोळी,पो.नाईक रितेश चौधरी यांनी ही कारवाई केली आहे तद्नंतर कायदेशीर कारवाईसाठी अन्न सुरक्षा विभागाकडे हा माल सोपविण्यात आला अन्न सुरक्षा विभागाचे सहा.आयुक्त वाय.के.बेडकुळे  यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. डी. महाजन, किशोर साळुंखे यांनी येऊन सदरील माल ताब्यात घेत जळगाव येथील अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यलायात जमा करण्यात आले आहे मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही  ग्रामीण पोलीस स्टेशनची ह्या कारवाईने  सर्वत्र कौतुक होत आहे तरी हा माल कुणाचा ? हा माल कुठ्न आणि कोणी आणला? या गाडीवरील ड्रायव्हर , क्लिनर असुन सुद्धा याचा खरा मालक कोण? यांचा खरा सूत्रधार कोण ? शहरात अनेक वेळा माल सापडतो आणि मालाचा मालक का सापडत नाही ? चोपड्यात खुलेआम गुटखा विक्री होत असते शेकडो वाहनातून गुटख्याची देवाण घेवाण होत असते  अनेक जण गुटखा न विकण्याचा आव आणता परंतु त्यांच्या येथे गुटखा  मिळतो  त्यांच्यावर कार्यवाही होणार का ? असा सवाल ही शहरात नागरिक करत आहेत. गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार समोर येणार की अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून नेहमी प्रमाणे चौकशीचा नावावर पेपर रंगवले जातील याकडे याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]