दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाश्रू
रोटरी तर्फे 121 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम पायांचे वितरण करण्यात आले
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क
रोटरी क्लब चोपडा रोटरी क्लब जळगाव वेस्ट व रोटरी क्लब न्यू कल्याण यांच्या तर्फे जिल्ह्यातील 121 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम पायांचे वितरण करण्यात आले. जळगाव येथील मायादेवी नगरातील रोटरी भवनात रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल डॉ आनंद झुनझुनवाला यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी रोटरी चोपडाचे अध्यक्ष ॲड रुपेश पाटील सचिव गौरव महाले प्रकल्प प्रमुख विलास कोष्टी सह प्रांतपाल नितीन अहिरराव चंद्रशेखर साखरे सुरेखा मिस्त्री डॉ ईश्वर सौनदानकर रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष सुनील सुखवानी सचिव विवेक काबरा प्रकल्प प्रमुख योगेश भोळे रोटरी न्यू कल्याणचे अध्यक्ष डॉ सुश्रुत वैध सचिव बिजू उन्नीथान प्रकल्प प्रमुख किरण पाटील नामदेव चौधरी पंकज चौधरी सुधीर नायर नितीन मंचकर रोटरी ठाणे नॉर्थच्या देवयानी वेद विनोद जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनीहि भेट देऊन या सेवा कार्याचे कौतुक केले







