महाराष्ट्र 9

राष्ट्रीय जंतनाशक दिनी जंतनाशक गोळ्यांचे वाटप..

[espro-slider id=13780]

राष्ट्रीय जंतनाशक दिनी जंतनाशक गोळ्यांचे वाटप..


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–


सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम’ वर्षातून दोन वेळा राबविण्यात येते. ही ‘ मोहीम यावर्षी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी राबविण्यात येणार आहे.


राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेमध्ये १ ते १९ वर्षे वयोगटाच्या ग्रामीण भागातील ९२००० व शहरी भागातील ४०००० असे एकूण १,३२,००० लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी आशा वर्कर्सने घरोघरी जाऊन या गोळ्यांचे वाटप केले. आतड्यांमधील कृमीदोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणार्‍या रक्तक्षय दूर करणे , कुपोषण दूर करणे , एकाग्रतेेत वाढ करणे , प्रतिकारशक्ती वाढविणे इत्यादी फायदेअसल्याचे त्यांनी सांगितले .


मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे तीव्र प्रमाणात कृमीदोष असलेले विद्यार्थी लवकर आजारी पडतात तसेच त्यांना लवकर थकवा येतो. परिणामी त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. या सर्व बाबींवर इलाज म्हणून जंतनाशक गोळी आवश्यक
असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित लाभार्थ्यांना १७ ऑक्टोबर रोजी सदर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य पर्यवेक्षक, जितेंद्र के मोरे तालुका आरोग्य सहाय्यक, सागर शिंपी तालुका समूह संघटक, दिलबर सिंग वळवी तालुका लसिकरण समन्वयक आदींनी परिश्रम घेतले…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]