गोरगावले ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवड… नामदेव बाविस्कर यांचे वर्चस्व कायम…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क
चोपडा तालुक्यातील ग्रा. प. गोरगावले बु” येथील उपसरपंच पदाची निवड सरपंच सौ. मिराबाई नामदेव बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच पदासाठी २ अर्ज प्राप्त झाले . त्यात पंचायत समिती सदस्य नामदेव बाविस्कर याचे पॅनलचे सदस्य नरेंद्र खुशाल बाविस्कर यांना ६ मते मिळाली. त्यात ग्राम पंचायत सदस्य सचिन ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र भगवान पानपाटील, पुष्पाबाई प्रकाश पाटील व रंजना अरुण कोळी आणि सौ. मिराबाई नामदेव बाविस्कर यांचे मोलाचे सहकार्य असून तसेच उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सरपंच यानी जाहीर केले व सरपंच यानी सर्वाचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले. विजयी उमेदवाराने सभागृहात जेष्ठ सदस्यांचे आशिर्वाद घेतले .सचिव म्हणून आर.ई. विसावळे ग्राम विकास अधिकारी यांनी कामकाज पाहिले. त्यांना ग्रा. पंचायत कर्मचारी चंद्रकांत पाटील , अजय बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.


निवडणूक कार्यक्रम संपल्यावर पंचायत समिती सदस्य नामदेव बाविस्कर , उपसरपंच नरेंद्र बावस्कर व सचिन पाटील, रविद्र पानपाटील, रंजना कोळी , पुष्पाबाई पाटोल व सरपचं मिराबाई बाविस्कर यांनी फुलहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्याप्रसंगी उपसरपंच भगवान बाविस्कर , प्रकाश पाटील, गोपाल ताराचंद बाविस्कर, दिनकर सपकाळे, मनोज पाटील,, दिनेश पाटील -चंद्रशेखर बाविस्कर , जनादन सपकाळे, विनोद बाविस्कर, विलास निकम, विठ्ठल शिरसाठ, उज्वल बाविस्कर, श्रीकांत बाविस्कर, सोपान कोळी ,, महेंद्र साळुंखे, लखन साळुंखे, सदानंद पाटील, बाबुलाल महाजन, शशीकांत पाटील, भिमराव’ सरदार, मधुकर सरदार, बापू बाविस्कर, सचिन बाविस्कर, राजेंद्र सरदार , महेंद्र बाविस्कर, मनोज वाघ, जगदिश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते…







