महाराष्ट्र 9

जिनिंग,प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार -चेअरमन माजी आ.कैलास पाटील #तापी शेतकरी सुतगिरणीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न…

[espro-slider id=13780]

जिनिंग,प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार -चेअरमन माजी आ.कैलास पाटील

तापी शेतकरी सुतगिरणीची वार्षिक सभा खेळीमेळीत



चोपडा – दोन वर्षे कोरनाचे संकट मोठ्या प्रयत्नांनी दुर सारल्यानंतर पार पडलेले आर्थिक वर्ष सूतगिरणीच्या प्रगतीत भर घालणारे असेल असे वाटले होते.परंतु कापसाचे भाव आणि प्रक्रिया केल्यानंतर सुत विक्री मधील तफावत कशी कमीतकमी राहून नुकसान टाळता येईल याचा कसोशीने प्रयत्न केला.पण सूतगिरणी तोट्यात जाण्यापेक्षा गिरणी बंद करावी लागली.आजही भावातील तफावत सूतगिरण्यांसाठी दृष्टचक्र ठरत आहे.महाराष्ट्रात अनेक सूतगिरण्या बंद आहेत, भविष्यात नक्कीच परिस्थिती बदलेल अशी आशा ठेवण्यास हरकत नाही.

तथापी शासनाने सुतगिरण्यांना काही सवलती आणि अनुदान देण्याचे मान्य केले आहे.शासनाचे अनुदान पदरी पाडून तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून स्वतःची जिनिंग व प्रेसिंग लवकरच सुरु करणार असल्याची माहिती सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी दिली. चोपडा तालुक्याच्या महत्वाकांक्षी सूतगिरणीच्या ३१ व्या वार्षिक सभेत चेअरमन माजी आ.पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.गुरूवारी दि.२९ रोजी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर झालेल्या सभेत प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व श्री महालक्ष्मींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.


यावेळी माजी शिक्षक आमदार प्रा.दिलिपराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.तर अहवाल वाचन जेष्ठ संचालक प्रकाश रजाळे व आर्थिक पत्रकांचे वाचन संचालक एस.बी.पाटील यांनी केले.
यासभेत सात विषयांना सभासदांनी एकामताने मंजूरी दिली.याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष गोरखतात्या पाटील, माजी शिक्षक आमदार प्रा.दिलिपराव सोनवणे,सूतगिरणीचे व्हा.चेअरमन पी.बी.पाटील, संचालक तुकाराम पाटील, भाऊसाहेब पाटील, रंजना नेवे,जागृती बोरसे,राजेंद्र पाटील, माधवराव पाटील,माजी कृउबा उपसभापती नंदकिशोर पाटील, माजी संचालक प्रभाकर बडगुजर,माजी शेतकी संघ उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे रमेश बाविस्कर,जनरल मॅनेजर विजय पाटील आदि मंचावर उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]