महाराष्ट्र 9

देशाला पर्याय म्हणून आम आदमी पक्ष उदयास येत आहे…प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांचे प्रतिपादन…

[espro-slider id=13780]

देशाला पर्याय म्हणून आम आदमी पक्ष उदयास येत आहे…प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांचे प्रतिपादन…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क.
पंजाब व दिल्लीमध्ये सत्ता आल्यानंतर व त्याठिकाणच्या विकासानंतर देशभरात आम आदमी पक्षात काम करणाऱ्यांची संख्या वाढत असून, येत्या तीन महिन्यात जळगाव जिल्ह्यात एक लाख नागरिकांपर्यंत आम आदमी पक्ष पोहोचविण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा संयोजक तुषार निकम यांनी केले आहे. मंगळवारी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे आम आदमी पक्षाचा जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


प्रत्येक तालुक्यात गावोगावी जाऊन लोकांना भेटा व आम आदमीचे पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवा. येत्या काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका आम आदमी पक्ष लढणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे सचिव धनंजय शिंदे यांनी जळगावच्या सभेत सांगितले .बैलपोळा सणाच्या वेळी बैलांच्या पाठीवर ५० खोके – एकदम ओके असे लिहून शिंदे गटाचा शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आणि त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन बोके असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले. त्या बोक्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून देशाला पर्याय म्हणून आम आदमी पक्ष उदयास येत असल्याचे प्रतिपादन प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी केले.


सुप्रीम कोर्टापासून ते तालुक्याच्या कोर्टापर्यंतच्या सर्व न्यायालये भाजपच्या ताब्यात आहेत .जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन केवळ दलाली करतात असा घणाघात आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केला .राज्यात लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होणार असून या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे यांनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्याचे राजकारण पाहिले तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे नसून ,बाकीचे आमदार तर खोके घेऊन ओके झाले आहेत. गिरीश महाजन हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा दलालीचेच काम करण्यात अधिक व्यस्त असल्याची घनाघाती टीका रंगा राचुरे यांनी केली.
सदर मेळाव्यासाठी राज्यकार्यकारणीतील रंगा राचूरे ( प्रदेश संयोजक ) , किशोर मांध्यान ( राज्य सह संयोजक ) , विजय कुंभार ( राज्य संघटक ) , धनंजय शिंदे ( राज्य सचिव ) , देवेंद्र वानखेडे , जगजितसिंग (कोषाध्यक्ष ) , डॉ.अल्तमश फैजी, मुकुंद किर्दत , ॲड कुसुमाकर कौशिक ,अन्सार शेख , नितीन गवळी आदी नेते उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुषार निकम ( जिल्हा संयोजक ) ,योगेश हिवरकर ( कार्याध्यक्ष जळगाव मनपा ) , विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा उपसंयोजक) प्रा.गणेश पवार ( जिल्हा उपसंयोजक ) डॉ. रूपेश संचेती ( संघटन मंत्री ), डॉ. महेश पवार ( सचिव ), डॉ.अनुजा पाटील ( महिला जिल्हा संयोजक ), इरशाद खान ( अल्पसंख्यांक जिल्हा संयोजक ), युवराज महाजन ( लोकसभा क्षेत्र प्रमुख , रावेर ) रईस खान ( प्रसिद्ध प्रमुख ) यांसह सर्व तालुका संयोजकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम आदमी पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे संयोजक तुषार निकम यांनी केले…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]