महाराष्ट्र 9

११ पैकी ५ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा..

[espro-slider id=13780]

११ पैकी ५ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा..
चोपडा प्रतिनिधी :–
ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदासाठीसुद्धा मतदान रविवारी करण्यात आलं. पहिल्यांदाच सरपंचपद हे मतदान करुन निवडलं जाणार असल्यानं ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरलीय.


महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज लागला असून या निकालाची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळाला लागली आहे. कारण महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातली ही पहिलीच निवडणूक आहे.


चोपडा तालुक्यात एकूण ११ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. त्यात ११ पैकी ५ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा फडकला असून उर्वरित ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले यात वैजापूर , देव्हारी , पिंप्री, मोहरद , मेलाणे या ५ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा म्हणजे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा दबदबा कायम असल्याचे दिसून आले तर मोरचिडा ,उमरटी ,कर्जाणे , सत्रासेन ,कृष्णापुर व बोरअजंटी या ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम दिसून आले.


लोक नियुक्त सरपंच पुढील प्रमाणे पावरा दत्तसिंग सुभाष (वैजापूर ) , पाडवी जुनाबाई किसन
( देव्हारी ) , भादले हरिशचंद्र सोनसिंग ( मोरचिडा ) , पावरा रिनेश रमेश (उमरटी ) , इंगळे वकील शिवाजी ( पिंप्री ) , अंजुम रमजान तडवी ( मोहरद ) , बारेला अलका सतिष ( कर्जाने ) ,
पावरा लालबाई प्रताप ( मेलाणे ) , भादले वंदना ज्ञानेश्वर ( सत्रासेन ) , बारेला पिनबाई गेमा ( कृष्णा पूर ) , बारेला शकुंतला धरमसिंग (बोरअजंटी )..


११ ग्रामपंचायतीसाठी एकूण मतदान १८७५० होते तर पैकी १५५६१ मतदान झाले एकूण मतदानाचे टक्केवारी ८२.९९ एवढी होती. सरपंच संख्या एकूण ११ होती तर सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र ५१ दाखल झाले होते .सदस्य संख्या एकूण ९९ होती मात्र नामनिर्देशन पत्र ११९ दाखल करण्यात आले होते पैकी ४४ सदस्य बिनविरोध करण्यात स्थानिकांना यश मिळाले आहे. ग्रामपंचायत उमरटी प्रभाग क्रमांक ३ मध्ये नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नाही म्हणून तेथील जागा रिक्त आहे.
मतमोजणीची प्रक्रिया नवीन तहसील कार्यालयात पार पडली सदर प्रक्रियेसाठी कर्मचारी व पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांमध्ये मोठ्या जल्लोषाचे वातावरण दिसून आले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]