महाराष्ट्र 9

अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

[espro-slider id=13780]

अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न


चोपडा (प्रतिनिधी)

शतकोत्तर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षास प्रवेशित नवोदित छात्राध्यापकांचा प्रवेशोत्सव व संस्थेच्या माजी सचिव श्रद्धेय स्व. संध्याताई मयूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्हाॅलीबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव मा. माधुरीताई मयूर होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धिष्णू फाउंडेशन, जळगाव या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अद्वैत दंडवते व अभियंता मा. श्री. विनीत पाटील उपस्थित होते.



ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात प्राचार्य श्री किरण पी. पाटील यांनी डी. एल. एड. ची प्रवेश प्रक्रिया, श्रद्धेय संध्याताई मयूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजनाबाबत तसेच वाय. सी. एम. ओ. यु च्या बी. ए. ,डी. एस.एम.अभ्यासक्रम निकालाबाबत प्रतिपादन केले. याप्रसंगी व्हॉलीबॉल स्पर्धेचा विजयी सकाळ विभाग संघ व उपविजयी गावातील विभाग संघ यातील शिक्षक बंधूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले व वाय.सी.एम.ओ.यु. च्या डी.एस.एम. अभ्यासक्रम परीक्षेमध्ये अभ्यासक्रेंद्रावर प्रथम येणारे श्री. प्रशांत एस.गुजराथी (मुख्याध्यापक, प्रताप विद्या मंदिर)यांचा सत्कार संस्थेच्या सचिव मा. माधुरीताई मयूर यांच्या हस्ते करण्यात आला.विद्यालयातील कलाशिक्षिका श्रीमती मीनल पाटील यांनी स्व.संध्याताई मयूर यांच्या तयार केलेल्या पोर्ट्रेटचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.



मा. अद्वैत दंडवते यांनी आपल्या मनोगतात समाजातील कचरा वेचणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुला-मुलींसाठी ‘आनंदघर’ सुरू करून अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना त्यांचे हक्काचे शिक्षण देण्याचा व आनंददायी बालपण देण्याचा संस्थेचा उपक्रम समजावून सांगितला व पुढे हा उपक्रम समग्र जिल्ह्यात राबविण्याचा मानस त्यांनी अभिव्यक्त केला. चोपडा शहरात देखील अशा वंचित मुलांसाठी ‘आनंदघर’ चालविले जाते त्याचे कामकाज मा. श्री. विनीत पाटील हे यशस्वीपणे पाहत आहेत.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या संस्थेच्या सचिव मा. माधुरीताई मयूर यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वागत केले व आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करून अध्ययन करावे व उत्तमोत्तम असे गुण आत्मसात करावे, कारण आपणच भविष्यातील पिढी घडविणार आहात असे प्रतिपादन केले. त्यासोबतच वर्धिष्णू फाउंडेशन मध्ये समाजातील वंचित मुलांसाठी कशाप्रकारे कामकाज सुरू आहे याचा देखील उल्लेख केला.



कार्यक्रम प्रसंगी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एम. पी. पाटील, औ. प्र. संस्थेचे प्राचार्य श्री भूषण पवार, प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री प्रशांत एस. गुजराथी, उपप्राचार्य श्री जे. एस. शेलार, पर्यवेक्षक श्री एस. एस. पाटील,संस्थेचे समन्वयक मा.श्री.गोविंद भाई गुजराथी, विद्यालयाच्या माजी प्राचार्य प्रा. योगिता बोरसे ,क्रीडा शिक्षक श्री नरेंद्र महाजन, श्री अभिजीत देसले, श्री.एजाज शेख,राष्ट्रीय पंच श्री समाधान माळी, स्पर्धेचे प्रमुख प्रा. मनोहर एन. मराठे व केंद्रसहाय्यक श्री महेंद्र एल पटेल, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा. मीनल पाटील, श्री दीपक विसावे, श्री संजय पाटील, श्री जितेंद्र पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रा जयश्री पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती गुजराथी यांनी मानले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]