लता सोनवणेंची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली : आमदारकी धोक्यात नाही माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे
चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिली.
जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी (9 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी जळगांव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती.


काय आहे प्रकरण?
लताताई सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते.
आमदार लताताई सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे, नंदुरबार यांनी तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. त्यातउपरोक्त चर्चेवरुन अर्जदार हे कागदोपत्री पुराव्याच्या आधारे तसेच आप्तभाव संबंध परिक्षेच्या आधारे (cultural affinity) त्यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा सिध्द करु शकलेले नाहीत. सबब वर नमुद कारणास्तव अर्जदार श्रीमती लताबाई महारू कोळी सौ. लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचा दावा अवैध घोषीत करण्यात येत असून अर्जदार यांनी सादर केलेले उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जि. जळगांव यांनी प्रमाणपत्र क्रमांक MRC : 39691160889 दिनांक 04.11.2020 अन्वये निर्गमित केलेले टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात येत आहे…


मा. आयुक्त, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव यांना याव्दारे आदेशित तथा प्राधिकृत करण्यात येते की, अर्जदार यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडणुक लढवीली असल्यामुळे तसेच अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे देय . लाभ घेतलेला जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १० व ११ अन्वये उचित कारवाई करण्यात यावी व केलेली कारवाई या कार्यालयास अवगत करावी. असे आदेश देण्यात आले होते .

उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला आहे. आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे. ती जलद गतीने व्हावी. आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस मागणी आहे. तसेच विधानसभेत दोन नंबरचे मत असणाऱ्या उमेदवाराला विजय घोषित करावे. त्या करता एक रिट पिटीशन दाखल करणार असल्याचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिली.

प्रा चंद्रकांत सोनावणे …
सदर निकालावर माजी आ प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाने खारीज केला आहे. वकिलाच्या सल्ला घेऊन पुन्हा सुप्रीम कोर्टात सदर याचिका आम्ही रि-ओपन करणार असल्याचे ते म्हणाले तसेच सदर निकालावरून आमदारकी धोक्यात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मला विश्वास आहे की, सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल. घाई गडबडीत आमच्या कडून काही चुका राहून गेल्या आहेत त्या वकिलांच्या सल्याने दुरुस्त करू व सुप्रीम कोर्टात पुन्हा सदर याचिका रि – ओपन करू…