*पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन.*
चोपडा प्रतिनिधी :–
येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुरेश बोरोले यांच्या शुभहस्ते अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. चोपडा व परिसरात रोबोटिक्स प्रशिक्षण देणारी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ही आता एकमेव शाळा ठरली आहे . उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध रोबोटिक्स उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित केले होते. आजच्या युगात शाळेतील विद्यार्थ्यांनी शिखरावर शिखर गाठावे व जागतिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी अशा शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनी दिल्या.

या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील,पंकज बालसंस्कार केंद्राच्या प्रमुख सौ. रेखा पाटील, पंकज इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य गणेश साळुंखेे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्यन अग्रवाल, साहिल चौधरी ह्या विद्यार्थ्यांचे मोबाईल द्वारे रोबोटिक्स कारचे प्रदर्शन अधिक आकर्षक ठरले. सी. बी. एस. ई. च्या अभ्यासक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य केला गेला आहे व याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे ह्या उद्देशाने संस्थेने या प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे.

अत्याधुनिक आंधळी काठी, घराची सुरक्षा व चार चाकी वाहनांचे जतन असे विविध उपक्रम प्रदर्शनासाठी मांडले होते. भविष्यात शाळेतील विद्यार्थी शास्त्रज्ञ बनावे अश्या शुभेच्छा मान्यवरांनीे दिल्या. रोबोटिक्स प्रशिक्षक महेश लांडगे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत.
