महाराष्ट्र 9

आर्मीच्या निवृत्त जवानाला चोपड़ा पोलीस निरीक्षकांकडून शिवीगाळ करत मारहाण # कानाला जबर दुखापत मागील तीन दिवसापासुन उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू # मा.खासदार रक्षा खडसे यांनी घेतली भेट

[espro-slider id=13780]

आर्मीच्या निवृत्त जवानाला चोपड़ा पोलीस निरीक्षकांकडून शिवीगाळ करत मारहाण # कानाला जबर दुखापत मागील तीन दिवसापासुन उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू # मा.खासदार रक्षा खडसे यांनी घेतली भेट

उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना माजी सेवानिवृत्त सैनिक पंकज पाटील




चोपडा तालुक्यातील घुमावल येथील रहिवासी सेवानिवृत्त आर्मी जवान पंकज दिलीप पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. पंकज पाटील हे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.



चोपड़ा येथील शारदानगर भागात राहत असलेले सेवानिवृत्त आर्मी जवान पंकज पाटील यांना 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही मारहाण झाली. आजी-माजी सेवाभावी संस्थेच्या सर्व जवानांनी यास निषेध व्यक्त केला आहे. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास पंकज दिलीप पाटील हे आपल्या मुलाला घेऊन बाजारासाठी गेले होते. तहसील कचेरीच्या खाली चावळी जवळ फुलहार घेत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पंकज पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी रस्त्यावर थांबून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत पुन्हा मारहाण करण्यातआली आहे .यावेळी त्यांचा लहान मुलगा तहसील कार्यालय जवळ रडत होता. आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण पोलीस ठाण्यात मारहाण करत होते. यावेळी त्यांनी 8 ते 10 वेळा कानशिलात लगावली. त्यामुळे त्यांच्या कानात दुखत असल्यामुळे त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. गेले 3 दिवस पासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.



रक्षा खडसेंची भेट

या प्रकरणी खासदार रक्षा खडसे,यानी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पंकज पाटील यांची भेट घेतली.व असले प्रकार एकदम चुकीचा आहे .पुढे असले प्रकार घडू नये या साठी जिल्हा अधीक्षक मंत्री गिरीशभाऊ महाजन व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे रक्षा खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.या वेळी उपस्थित माजी सैनिक संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी खासदार रक्षा खडसे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांचे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत आमची संघटना आंदोलन करत राहू अशा इशारा संघटनेचे अध्यक्ष कैलास दत्ता उपाध्यक्ष गोपाल सोनावणे सचिव संदीप बडगुजर यांच्यासह आजी माजी सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. घडलेल्या प्रकरण संदर्भात जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर करणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]