चोपडा येथे आम आदमी पक्षाची बैठक उत्साहात संपन्न… अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश…
चोपडा प्रतिनिधी :—
येथील शासकीय विश्रामगृहात जळगाव जिल्ह्याचे सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पक्षाची बैठक उत्साहात संपन्न झाली. सदर बैठकीत नवीन सदस्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला त्यात रामचंद्र भालेराव ( निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ) , समाधान बाविस्कर ( वराड ) , संदीप ओली ( पत्रकार ) , प्रशांत बुवा , हसन तेली , शेख जलीस अहमद , रतिलाल भिल्ल , हिंमत मोरे , बापू गायकवाड , आबा सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

तालुका व शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यात तालुका संयोजक म्हणून आर डी पाटील , तालुका सहसंयोजक ( पूर्व भाग ) कृष्णा सोनवणे , तालुका सहसंयोजक ( पश्चिम भाग ) समाधान बाविस्कर , सचिव – राकेश डिगंबर पाटील आदींची निवड करण्यात आली. तर शहर संयोजक म्हणून इंजि. सुधीर पाटील , शहर सचिव – रामचंद्र भालेराव, शहर युवा संयोजक म्हणून हसन तेली यांची निवड करण्यात आली.

सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात नवीन सदस्यांचा पक्ष प्रवेश , तालुका व शहर कार्यकारिणी गठित करणे , तसेच ३१ डिसेंबर अखेर चोपडा तालुक्यातून ५००० नवीन सदस्यांची नोंदणी करण्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली व नवीन सदस्य नोंदणी फॉर्म वितरीत करण्यात आले. येत्या काळात प्रत्येक वॉर्डांत व प्रत्येक गावात आम आदमी पक्षाची शाखा उघडून कार्यकारिणी गठित करून बोर्ड लावणे , नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणे , दर पंधरवाडा , महिन्यात विविध समस्याबाबत निवेदने देणे , लोकांच्या समस्या सोडविणे , पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविणे आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीसाठी विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा सहसंयोजक ) , आर डी पाटील ( तालुका संयोजक ) , सुधीर पाटील ( शहर संयोजक ) , राकेश पाटील ( तालुका सचिव ) , कृष्णा सोनवणे ( तालुका सहसंयोजक ) , शैलेंद्र पवार , कमलेश बारेला , वेडूराम बारेला , समाधान भालेराव यांसह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर पाटील यांनी केले…
