चोपडा महाविद्यालयात अक्षय पाटीलचा सत्कार
चोपडा प्रतिनिधी :–
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी चि. अक्षय मणिलाल पाटील यांची युपीएससी- ईपीएफओ परीक्षेमध्ये देशातून ३११ रँक मिळवून एन्फोर्समेंट आॕफिसर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल , त्यांचा व त्यांच्या पालकांचा संस्थेचे अध्यक्ष अॕड संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला.


अध्यक्षीय मनोगतात अॕड संदीप पाटील म्हणाले की, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जिद्द , मेहनत ,चिकाटी व नवनवीन ज्ञान स्त्रोताच्या सहाय्याने युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये भारतातून चांगला रँक मिळवून अधिकारी बनतात , उत्कृष्ट सेवा देत महाविद्यालय व संस्थेच्या नावलौकिकात भर घालतात याचा खूप आनंद होतो.अक्षय सत्काराला उत्तर देतांना म्हणाला की, महाविद्यालयात ११ वी व १२ वी विज्ञान वर्गात शिकत असतांना मिळालेली ज्ञानाची शिदोरी व संस्कार व आईवडीलांचे पाठबळ यामुळेच यश खेचून आणता आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डाॕ स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी, अक्षयचे आईवडिल मणिलाल पाटील व सौ मनिषा पाटील , उपप्राचार्य प्रा बी एस हळपे , पर्यवेक्षक प्रा एस पी पाटील , समन्वयक प्रा ए एन बोरसे , प्रा अतुल पाटील , मनेष देसले आदी उपस्थित होते.

