महाराष्ट्र 9

स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव उर्दू कन्या शाळेत उत्साहने साजरा गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम चा हस्ते ध्वजारोहण…

[espro-slider id=13780]

स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव उर्दू कन्या शाळेत उत्साहने साजरा गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम चा हस्ते ध्वजारोहण,,,,,,



चोपडा ,(प्रतिनिधी)
आज 15 आगष्ट स्वातंत्र्य दिवस ,अमृत महोत्सव जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा नंबर 1 चोपडा येथे उत्साहने साजरा करण्यात आला या वेळी चोपडा तालुका गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांचा शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी वंदना बाविस्कर मॅडम , केंद्र प्रमुख उत्तम चौहान सर ,विषय तज्ञ प्रशांत सर ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद शिकलगर प्रमुख उपस्थित होते ध्वजारोहण नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले व कॉम्प्युटर लॅब चे उदघाटन करण्यात आले ,कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद जफर अली , सदस्य ,शेख साजीद जाबीर ,जमिल खान ,खालिद मिर, साबीर शेख ,यांचाहस्ते करण्यात आले ,या वेळी राज मोहम्मद शिकलगर ,केंद्र प्रमुख उत्तम चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी सर्व शिक्षकांचे शाल ,फुल देउन सम्मान करण्यात आले विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ,व खाऊ वाटप करण्यात आले अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी मॅडम यांनी शाळेत राबविले जाणारे उपक्रमाची प्रशंशा केली शाळेला लागणारे सर्व सुविधा पुरविण्यात येईल व शाळेला शिक्षकांची कमतरता पडू दिली जाणार नाही शाळेचा दर्जा व गुणवत्ता कशी वाढविता येईल या कडे लक्ष दिले जाईल ,शालेय व्यवस्थापन समितीचे कौतुक केले ,व मुख्यध्यापक जाकीर सर व शिक्षिका फातेमा मॅडम यांनी शाळेला बिकट प्रस्तीत सावरले म्हणून विशेष कौतुक केले शाळेला पूर्वीचे दिवस येवो अशी शुभेच्छा दिल्या आम्ही सर्व तुमचा सोबत आहो अशी शाळेचा उन्नती साठी आम्हला एक हाक द्या आम्ही सर्व अधिकारी शाळेचा विकासासाठी हजर राहू असे आश्वासन दिले, कार्यक्रम नंतर उपस्थित मान्यवरानी शाळेची पाहणी केली.


कार्यक्रम चे सूत्र संचालन अब्दुल रज्जाक सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी ,जाकीर सर,फातेमा मॅडम, प्रांजली पाटिल मॅडम ,अब्दुल रज्जाक सर ,इरतेजा शेख , शालेय व्यवस्थापन समितीचे सय्यद जफर ,शेख साजिद,खालिद मीर, जमिल खान,साबीर शेख आदींनी परिश्रम घेतले या वेळी मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]